लहान मुलं अतिशय निरागस आणि गोंडस असतात. त्यांचे वागणे बोलणे खूपच निर्मळ असते आणि ते सर्वांनाच आवडते. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगा आपल्या रुसलेल्या शिक्षिकेला मानवण्याचा प्रयत्न करत आहे. ही शिक्षिका त्याच्या कोणत्यातरी गोष्टीवर नाराज आहे. यावेळी या मुलाने असे काही केले, की ज्यामुळे नेटकरी त्याचे कौतुक करताना थांबत नाही आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुलाची कृती नेटकऱ्यांना भावली आहे. या मुलाची शिक्षिका त्याच्यावर रुसली आहे. तो तिने सांगितलेलं काहीही ऐकत नाही, अशी तिची तक्रार आहे. शिक्षिका आपल्याशी बोलत नाही हे पाहून या चिमुकल्याला वाईट वाटते आणि तो त्यांना मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, शिक्षिका या मुलाचे काहीही ऐकत नाही. यानंतर मुलाने असे काही केले की सर्वांची मनं जिंकली. आता मुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्याला खूप पसंत करत आहेत.

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शिक्षिका रागावलेली दिसत आहे. ती या मुलाला म्हणते, ‘मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही.’ तर मुलगा शिक्षिकेची समजूत घालू लागतो आणि ‘आता मी नाही करणार’ असं म्हणू लागतो. यावर शिक्षिका म्हणते, ‘तू नेहमी असंच म्हणतोस आणि पुन्हा पुन्हा तेच करतो.’ यानंतर हा चिमुकला शिक्षिकेच्या गालावर किस करतो आणि तिला पुन्हा मस्ती करणार नाही, असे वचन देतो.

हा व्हिडीओ खूपच सुंदर असून नेटकऱ्यांना तो खूपच आवडला आहे. छपरा झिला नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत १ मिलिअनपेक्षाही अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.