माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून दृश्य पाहणे हे बर्‍याच लोकांसाठी स्वप्न आहे, परंतु हा प्रवास प्रत्येकालाच जमेल असं नाही. जगातील सर्वात उंच पर्वत रांगेच्या शिखरावर जाणारा ट्रेक धोकादायक तसेच थकवणारा आहे आणि या कारणामुळे बहुतेकजण कधीही हा अविश्वसनीय अनुभव घेऊ शकले नाहीत. पण आता सगळ्यांना हा अविश्वसनीय अनुभव घरीच बसून घेता येत आहे. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून काढलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये ?

हा व्हिडीओ ट्विटरवर डॉ.अजयिता यांनी पोस्ट केला आहे, जे होरायझन हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आहेत. त्यांनी त्यांच्या हँडलवर व्हिडीओ पोस्ट केला आणि कॅप्शन दिले, “जगाच्या वरून एक दृश्य. माउंट एव्हरेस्ट.”व्हिडीओमध्ये एका ट्रेकिंग गटाचा सदस्य गोप्रो कॅमेऱ्यातून सहाय्याने आजूबाजूचा फोटो काढताना दिसत आहे. व्हिडीओ बघून आपल्याला अंगावर नक्कीच शहारे येतील.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

लँडस्केपच्या मंत्रमुग्ध दृश्याचा व्हिडीओ आतापर्यंत ३५,००० हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे.

तसेच व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं आहे आणि शेकडो कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडीओने नेटिझन्सना चकित केले आहे. व्हिडीओ बघून अनेकांनी काही दिवसात जगातील सर्वोच्च बिंदूच्या शिखरावर चढण्याची इच्छा व्यक्त केली.

Story img Loader