Hyderabad Rain of Notes Video : मुलांनी एखादी महागडी वस्तू मागीतली की आई-वडील सर्रास म्हणतात, घरात काय पैशांचा पाऊस पडतोय का? खरं तर आपल्यापैकी अनेक जण पैशांचा पाऊस खरंच पडतो की काय? असा विचार करत लहानाचे मोठे झाले असतील. पण ही केवळ कल्पना नाही, परिकथांप्रमाणेच खरंच एखाद्या ठिकाणी पैशांचा पाऊस पडला तर… हो असाच काहीसा प्रकार हैदराबाद येथे घडला. या ठिकाणी एका चौकात चक्क ५००-५०० रुपयांच्या नोटांचा अक्षरश: पाऊस पडला होता. नोटांचा हा खच पाहून शेकडो लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. या अजब प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ ३० सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये हैदराबाद शहरातील चारमिनार इथल्या गुलजार हौज रोडसमोर एक व्यक्ती उभा आहे. इथल्या गुलजार हौज रोडवर असलेल्या कारंज्यावर नोटा उडवताना दिसून येत आहे. या व्यक्तीने यापूर्वी सुद्धा अनेकदा असेच कृत्य केल्याचं सांगण्यात येतंय. जेव्हा तेथून जाणाऱ्या लोकांनी त्याला नोट उडवताना पाहिले तेव्हा त्यांनी या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवला. मीडिया रिपोर्ट्स आणि इतर दाव्यांनुसार, तो माणूस जवळच्या ओळखीच्या व्यक्तीचे लग्न साजरा करण्यासाठी नोटांचा वर्षाव करत होता.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला जेव्हा अस्वलाकडून हाय फाईव्ह मिळतं…; १७ मिलियन व्ह्यूज
आजूबाजूला कार आणि बाईक थांबवून लोक हा प्रकार बघत आहेत. रस्त्यावर इतस्ततः पाचशे रुपयांच्या नोटा पडल्या आहेत. त्या नोटांवरच वरातीतील मंडळी थिरकत आहेत. शेरवानी आणि कुर्ते घातलेले वराती आपल्याच नादात मश्गूल आहेत. त्यांच्यातील एकजण बाजूला येतो, खिशातून नोटांचं बंडल काढतो आणि त्या नोटा हवेत भिरकावून देतो. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षाव सुरू केलाय. या कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.
आणखी वाचा : रस्त्यावर कॉटन कँडी विकणारा माणूस भावूक झाला, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही रडू येईल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : रंग बदलणारा पक्षी कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!
एका ट्विटर यूजरने लिहिले की, गरिबांना दान करा. अशा प्रकारे आपल्या देशाच्या चलनाचा अपमान करून तुम्ही कोणतेही अभिमानाचे काम केलेले नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, तुमच्याकडे इतके पैसे आहेत की तुम्ही ते हवेत उडवत आहात, त्याऐवजी तुम्ही ते गरजूंना दान केले तर बरे. अशा अनेक संस्था आहेत ज्या समाजाच्या हितासाठी काम करतात आणि त्यांना पैशाची गरज असते. दुसऱ्या युजरने या व्यक्तीचे पैसे उडवण्याचे कृत्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आणि हे निर्लज्ज प्रदर्शन असल्याचे म्हटले आहे. यामुळे अनेक भुकेल्यांना अन्न मिळू शकते.