Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे नेहमी जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. एका वडिलांना नेहमी त्यांची मुलगी राजकुमारी वाटते. वडील अनेकदा व्यक्त होत नाही पण त्यांच्या लेकीवर त्यांचे खूप प्रेम असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बापलेकीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. लग्नात मुलीला नवरीच्या रुपात पाहून वडिल जे काही प्रतिक्रिया देतात ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्तीचे आयुष्य बदलते. विशेषत: भारतीय संस्कृतीनुसार मुलीला आईवडिलांचे घर सोडून सासरी जावे लागते. हा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण मानला जातो. तिच्यासह तिच्या कुटूंबासाठी हे सर्व अवघड जातं. विशेषत: आईवडिलांसाठी. त्यामुळे आईवडिल नेहमी आपली मुलगी नेहमी आनंदी राहावी, याचाच जास्त विचार करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीला नवरीच्या कपड्यांमध्ये पाहून वडिल भावूक होतात आणि मुलीवर कौतुकाचा वर्षाव करतात.
हेही वाचा : VIDEO : चिमुकल्याने केला एक नंबर डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवरी दिसेल. तिने सुंदर लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. मुलीला या लाल लेहेंगामध्ये बघून तिचे आईवडिल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. ती खूप सुंदर दिसतेय, असे सांगताना दिसतात. पण वडिलांची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेते. वडिल भावनिक होऊन म्हणतात, “ओह माय गॉड, खूप सुंदर. मजा आली, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड. तु सर्व काही काही दिसत आहे. खूप सुंदर” नवरीची आई सुद्धा तिचे कौतुक करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांचे आईवडिल आठवतील तर काही लोकांना त्यांच्या मुलीच्या लग्नातील तिचा लूक आठवेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Ritika Sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” एवढं कौतुक तर वडिलच करू शकतात.” तर एका युजरने लिहिलेय, “वडील कधीच व्यक्त होत नाही. पण मला यांची प्रतिक्रिया आवडली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून रडू आले. त्यांच्या भावना बघा”