सोशल मीडियावर जंगलाच्या राज्याचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. सिंह एका झटक्यात आपली शिकार फाडून टाकतो. भयंकर गेंड्यांपासून ते उंच जिराफापर्यंत, सिंह काही क्षणात शिकार करतो. वन्यजीवांच्या व्हिडीओजमध्ये सिंहांचे व्हिडीओ सर्वाधिक पसंत केले जातात. असाच एक सिहांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहाला भूक सहन होत नाही!

सध्या सोशल मीडियावर सिंहाचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्याच सिंहिणीवर हल्ला करताना दिसत आहे. खरं तर, सिंह बराच वेळ भुकेला होता आणि त्याला शिकारीसाठी कोणताही प्राणी सापडला नाही. भुकेमुळे सिंह खूप चिडला होता. यानंतर तो शिकारीसाठी आपल्याच सिंहीणीवर पडतो. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिंह दोन सिंहीणींसोबत भांडत आहे.

(हे ही वाचा: Viral Photo: घोडा नक्की कोणत्या दिशेने चालला आहे? तुम्ही देऊ शकता का योग्य उत्तर ?)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलाचा राजा भुकेने त्रस्त आहे. तो जंगलात शिकारीसाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याला शिकार मिळत नाही. शेवटी, त्याच्या संयमाचा बांध फुटतो, त्यानंतर तो त्याच्या जवळच्या दोन सिंहींवर पडतो. व्हिडीओमध्ये सिंह सिंहिणीवर हल्ला करताना दिसत आहे. सिंहीणही सिंहाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

(हे ही वाचा: Viral: ‘हा’ चिमुकला चक्क विशालकाय अजगरावर बसून करतोय मज्जा! video बघून नेटीझन्सही झाले हैराण)

(हे ही वाचा: Viral Photo: ऑप्टिकल इल्युजन असलेल्या ‘या’ फोटोत तुम्हाला काय दिसत आहे?)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

त्यांच्यात मोकळ्या मैदानात बराच वेळ मारामारी होते. तथापि, शेवटी ते एकमेकांना सोडून जातात. wild_animal_shorts नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सिंह आणि सिंहीणीच्या भांडणाचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.