कुत्र्यांची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. काहीवेळा कुत्र्याचे असे कारनामे बघून कित्येकदा आपण हैराण देखील होतो. मात्र सोशल मीडियावर एका कुत्र्याची चांगलीच चर्चा आहे. हा कुत्रा सोशल मीडियावर स्टारच ठरला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने केलेला पराक्रम पाहून तुम्ही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हुशार कुत्रा स्वत: पायऱ्यांवरून भरभर खाली उतरताना दिसत आहे. सुरूवातीला हा कुत्रा मोठ्या आत्मविश्वासाने लाकडी पायऱ्यांच्या दिशेने वळतो आणि तो आपलं नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करतो. हा आत्मविश्वासू आणि स्मार्ट कुत्रा पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. सुरूवातीला पायऱ्यावरून हा कुत्रा उतरू शकणार नाही, असं वाटतं. पण नंतर जे दिसून येतं ते पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यावरही विश्वास बसत नाहीय. हा कुत्रा कुठेही न डगमगता, न पडता व्यवस्थित एक एक पायऱ्यांवर आपले पाय बरोबर ठेवून भरभर खाली उतरतो.

आणखी वाचा : लाकडी काठ्यांपासून बनवला बुलडोझर, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

या व्हिडीओतील कुत्र्याचे कौशल्य पाहून अनेकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. हा व्हिडीओ iamraktim21 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की लोक हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह त्यांना आवरता येत नाहीय.

आणखी वाचा : हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हत्ती फिरताना दिसले, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हिजाब घालून ओणम साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहून लोकांचं मोठंच मनोरंजन होत आहे. लोक विविध प्रकारच्या कमेंट्ससह भरभरून लाइक्स देत आहेत. एका दिवसात हा कुत्रा सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध झाला आहे. लोक पुन्हा-पुन्हा हा व्हिडिओ पाहत कुत्र्याचं कौतुक करत आहेत.

Story img Loader