Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यातील काही व्हिडीओ ठरवून शूट केले जातात. त्यामध्ये लोकांचे मनोरंजन करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर, काही व्हिडीओतील घटना नकळत शूट केलेल्या असतात; ज्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन, लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण अवाक् झाल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही आजपर्यंत तुमच्या खऱ्या आयुष्यात किंवा चित्रपट, मालिकांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगात आल्याचे पाहिले असेल. अंगात येणे या गोष्टीकडे अनेक जण अंधश्रद्धा म्हणून पाहतात; तर काही जण याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. या सर्व गोष्टी अनेकदा मंदिरांमध्ये किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमात दिसून येतात. पण, आता अशी घटना चक्क एका चित्रपटगृहामध्ये घडल्याचे पाहायला मिळत आहे.

नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये कन्नड भाषेतील ‘भैरादेवी’ हा चित्रपट सुरू असून, यावेळी चित्रपटातील गाणे सुरू होते. चित्रपटातील देवीच्या गाण्याने चित्रपटगृहात बसलेल्या एका प्रेक्षक महिलेच्या अचानक अंगात येते. महिलेच्या अंगात आल्याचे पाहून दोन पुरुष तिच्याजवळ येऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mr.dpictures या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘म्हणून कोणाला हलक्यात घेऊ नका..’, खेकड्याबरोबर मस्ती करणं मांजरीला पडलं महागात; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बापरे, हा कोणता चित्रपट आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हे खरं आहे का?” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “तिचे हावभाव पाहून मला खूप भीती वाटतेय.” चौथ्या युजरने लिहिलेय, “खूपच थरारक.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video when the movie started the women in the theater started making strange gestures sap