Lion Vs Tiger Fight Video: सिंहाला जंगलाचा निर्विवाद राजा ही पदवी मिळते. त्यामुळे “सिंह विरुद्ध कोणताही प्राणी” अशी लढाई झाल्यास कोण जिंकेल या प्रश्नाचे उत्तर स्पष्टच असावे, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का अभ्यासकांच्या माहितीनुसार सिंह इतर कोणत्याही प्राण्यापासून जिंकू शकत असला तरी जंगलाचा डॉन म्हणजे वाघासमोर त्याला आपली सर्व शक्ती एकवटून लढायला लागते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की बंगालचा वाघ आणि आफ्रिकन सिंह यांच्यातील लढतीत वाघ जिंकण्याची ९० टक्के शक्यता आहे. वाघ हा सिंहापेक्षा किंचित वेगवान, वादातीतपणे अधिक क्रूर आणि अधिक चपळ असतो. तसेच वाघ हा सिंहापेक्षा ५ टक्के उंच आणि ८ टक्के जड असतो. आता या शाब्दिक तर्कवितर्कांसह एक खरोखरची लढाई सुद्धा आपण आज पाहणार आहोत.
युट्युबवर ‘नेपाळ H20’ या चॅनलने शेअर केलेल्या वाघ व सिंहाच्या लढाईत ‘करा वा मरा’ ची परिस्थिती पाहून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. ३८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार शेअर केला जात आहे. वाघाने सिंहावर अचानक हल्ला केल्याने प्राणघातक लढा सुरू होतो. मग सुरु होते कॅमेऱ्यात कैद झालेली सर्वात विलक्षण प्राण्यांची मारामारी. वाघाच्या हल्ल्यानंतर सिंह संतापतो आणि त्याच्यावर पंजा मारून पलटवार करतो. एकावेळी दोघेही एकमेकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना झाडावर चढणे शक्य होत नसल्याने जीव वाचवण्यासाठी ही लढाई सुरु राहते.
Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार
तुम्ही पाहू शकता की इथे सिंहापेक्षा वाघ आकाराने लहान दिसत आहे. अगदी कमी वेळात सर्व शक्तीचा वापर करून वाघ सिंहाला जमिनीवर पाडतो. शेवटी आपण सिंहाच्या शरीरावर आणि डोळ्याजवळ अनेक जखमा झालेल्या पाहू शकता. पण यातही तो थकला नाही सिंहाने पुन्हा हल्ला करायला सुरुवात केली व जवळजवळ बेशुद्ध झालेल्या वाघाने परत लढा दिला. सिंह देखील या लढाईने खूप थकला होता आणि जखमी अवस्थेत त्याला लढाई सुरू ठेवता आली नाही म्हणून तो पळून गेला.
सिंह विरुद्ध वाघ लढाई
दरम्यान मागील काही दिवसात प्राण्यांच्या लढाईचे अनेक विलक्षण व्हिडीओ समोर आले आहेत. कधी हत्तीवर सिंहीणीचा हल्ला, कधी झेब्र्याचा सिंहाशी लढा. हे व्हिडीओ पाहून जंगलातील थरार जवळून पाहण्याची संधी नेटकऱ्यांना मिळते. आता व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला व तुम्ही वाघ की सिंह कोणाच्या बाजूने आहात हे नक्की कळवा.