Viral video: रात्री मित्रांसोबत, गर्लफ्रेंडसोबत किंवा बायकोसोबत बाहेर फिरायला जाणं, नाईट आऊट मारणं हे सर्वांनाच आवडतं. मात्र अनेकदा अशा प्लॅनदरम्यान काहीतरी विचित्र, मजेशीर, धोकादायक घटना घडतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये आउटिंगला गेलेल्या काही मित्रांच्या गाडी समोर अचानक एक सिंह येतो. तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक तुमच्या गाडीसमोर वाघ, सिंह किंवा कोणताही जंगलाी प्राणी आला तर? अशी प्रत्यक्षात घटना घडली असून बाहेर रात्री फिरण्यासाठी गेलेल्या कपलच्या गाडीसमोर सिंह आला. हे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यानंतर पुढे काय घडतं ते सर्व कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे आणि सर्वत्र काळाकुठ्ठ अंधार पसरलेला आहे. दुचाकीस्वार केवळ त्याच्या बाइकच्या हेडलाइट्सच्या प्रकाशामध्ये पुढे जात आहे. अचानक अंधारातून त्यांच्याकडे चालत एक सिंह येत होता. हे पाहून त्यांना तर घामच फुटतो. ते गाडी थांबवून त्याच्याकडे गाडीचा लाईट दाखवतात जेणेकरुन तो तेथून जाईल. तो हळूहळू त्यांच्या गाडीकडे चालत येतो तशी आधी मागच्या मागे तरुणी पळून जाते तर नंतर तरुण गाडीवरुन उतरुन पळून जातो. त्यानंतर सिंहही त्यांच्या मागे पळत जातो. हे काही सेकंद श्वास रोखणारे आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एवढी हिम्मत येतेच कुठून? पुण्यात एसटीसमोर तरुणांनी ओलांडली मार्यादा; बोला पुणेकर काय केलं पाहिजे यांचं?

wildtrails.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.या व्हिडिओसह युजरने दावा केला आहे की, तो गुजरातमधील गीरचा आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – तो माणूस बाईक सोडून पळून गेला कारण त्याला माहित होते की, जर त्याने गाडी हलवण्यात आपला वेळ वाया घालवला तर शिकारी सिंह त्याच्यापर्यंत पोहोचेल. अशाप्रकारे अनेकांनी या कपलचा निर्णय योग्य असल्याचं म्हंटलंय, तुम्हीही आम्हाला कमेंट करुन सांगा या कपलचा पळून जाण्याचा निर्णय योग्य होता का ?

Story img Loader