Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा अपघातांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ते समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. नुकताच असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण स्टंट करण्याच्या नादात असताना त्याच्याबरोबर असं काही घडतं की, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणाबरोबरही असंच होताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण रस्त्यावरून स्पोर्ट्स बाईक चालवताना मध्येच स्टंट करण्यासाठी चालू बाईकवर उभा राहतो आणि बाईकच्या मागचे चाक उचलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यावेळी तो बाईकचे चाक उचलताच ते चाक निघून रस्त्याच्या कडेला जाऊन पडते. बाईकचे चाक निघाले तरीही बाईक चालक न थांबता पुढच्या चाकावर गाडी चालवतो. बाईकचालकाचा हा स्टंट पाहून काही जण त्याचं कौतुक; तर काही जण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, तो इन्स्टाग्रामवरील @posiitive_vibess या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीदेखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “अ‍ॅक्टिंग असावी तर अशी…”; चालू बाईकवर बसून ‘बुरूम बुरूम’ गाण्यावर चिमुकलीनं बनवली रील; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

यावर एका नेटकऱ्याने लिहिलेय, “कशाला असले नको ते स्टंट.” आणखी एकाने लिहिलेय, “याला म्हणतात खरा रायडर.” आणखी एकाने लिहिलेय, “भावा, तुझ्यासाठी १ लाईक खरं तर, तुमचा व्हिडीओ काढायचा अंदाज चुकला होता; पण तू थांबला नाहीस.” आणखी एका युजरने गमतीमध्ये लिहिलेय, “दुनियातला सगळ्यात मोठा रायडर.”