Viral Video: गुगलच्या GPS यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एखाद्या अनोळख्या ठिकाणी जाण्यासाठी या यंत्रणेची मदत होते. GPS द्वारे त्या-त्या ठिकाणाचा भौगोलिक नकाशा पाहायला मिळतो. गाडीने प्रवास करताना न चूकता योग्य रस्त्यावरुन जाण्यासाठी बहुतांश लोक गुगलच्या या सेवेचा वापर करत असतात. पण काही वेळेस GPS ने दिलेल्या सूचनांमध्ये गडबड होऊ शकते. अशा वेळी या यंत्रणेवर विश्वास ठेवून गाडी चालवणाऱ्या चालकांचे नुकसान होऊ शकते. GPS चा वापर करुनही चकवा लागून ते रस्ता भटकू शकतात.

हवाईमध्ये सध्या अशीच एक घटना घडली आहे. एक महिला तिच्या बहिणीसह गाडीने प्रवास करत होती. रस्ता ठाऊक नसल्याने तिने GPS सिस्टीमची मदत घेतली. पुढे सिस्टीमद्वारे देण्यात आलेल्या सूचना फॉलो करत असताना त्या महिलेने गाडी समुद्रात घुसवली. हवाईमधील कैलुआ-कोना या ठिकाणी ही घटना घडली. गाडीचा अपघात झाला असताना किनाऱ्यावर काही स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यातील क्रिस्टीन हचिन्सन नावाच्या महिलेने घटनास्थळाचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला.

क्रिस्टीन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक गाडी समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसत आहे. या गाडीमध्ये दोन महिला असल्याचेही पाहायला मिळते. गाडी पाण्यामध्ये बुडायला लागल्यावर किनाऱ्यावरील लोक गाडीत अडकलेल्या महिलांना बाहेर काढतात. पुढे गाडी पाण्याबाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतानाही दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. असंख्य यूजर्सनी या व्हिडीओखाली कमेंट केले आहे. यातील बऱ्याच यूजर्सनी महिलांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी चालक महिलीच्या गाडी चालवण्याच्या कौशल्याची खिल्ली उडवली आहे.

आणखी वाचा – Video: रेल्वेरुळाच्या शेजारी Reel बनवणं तरुणाला पडलं महागात; चालताना मागून वेगवान ट्रेनने दिली धडक अन्…

द वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिस्टीन यांनी सांगितले की, पाऊस पडत असताना मी किनाऱ्यालगत चालत न भिजण्यासाठी प्रयत्न करत होते. तेवढ्यात एक गाडी वेगाने किनाऱ्याकडे येताना दिसली. गाडीमध्ये असलेल्या दोघी बहिणी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भिती नसून आत्मविश्वास होता. गाडी समुद्रात बुडायला लागल्यावर त्यांना मदत करायला बाकीचे लोक पुढे सरसावले. माझे पती बचाव दलात आहेत. त्यांनी इतर लोकांसह मिळून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी त्यांनी पुढच्या सीटवर बसलेल्या त्या बहिणींना गाडीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. न्यूयॉर्क पोस्टला मिळालेल्या माहितीनुसार, गाडीमध्ये असणाऱ्या दोघी बहिणी या मंटा रे स्नोर्कल टूर कंपनी कुठे आहे हे शोधत होते. रस्ता माहीत नसल्याने त्यांनी GPS ची मदत घेतली आणि दिलेल्या सूचना फॉलो करत गाडी समुद्राकिनाऱ्यापर्यंत आणली.

Story img Loader