जी-२० देशांच्या नेत्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रोमला पोहोचले. त्यांनी अलीकडेच भारतीय डायस्पोरामधील अनेकांशी संवाद साधला आणि तेव्हा ते मराठी आणि गुजरातीमध्ये बोलले. इटलीमध्ये २२ वर्षे पूर्ण केलेल्या आणि देशात योग शिकवणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच गर्दीतील एका महिलेनेही पंतप्रधान मोदींशी गुजराती भाषेत संवाद साधला आणि त्यांनी तिला प्रतिसाद दिल्यावर आनंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएम मोदी अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” नंतर पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले.पंतप्रधानांनी त्याला विचारले की तो देशात काय करतो ? त्यावर त्याने सागितलं की तो २२ वर्षे इटलीमध्ये योग शिकवतो, तसेच आयुर्वेदिक पद्धतींबद्दल देखील बोलला. ज्याने पंतप्रधान मोदी प्रभावित झाले. तेवढ्यात, गर्दीतील एका महिलेने पीएम मोदींना संबोधित केले आणि उत्साहाने “केम चो” ओरडले आणि भारताच्या पंतप्रधानांनी “माजा मा” असे उत्तर दिले तेव्हा आनंद झाला.

दौऱ्यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यापूर्वी दिलेल्या माहितीत सांगितले होते की, जागतिक अर्थव्यवस्था सुधारणे आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांवर ते रोममध्ये बोलणार आहेत. एवढेच नाही तर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप यांचीही भेट घेणार आहेत.या भेटीदरम्यान ते व्हॅटिकन सिटीलाही भेट देतील आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ आहे. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ते रोममध्ये असतील. यानंतर ते ग्लासगो येथे हवामान बदलावरील शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी जाणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video while greeting the prime minister in rome the person in front suddenly said hello i am from nagpur ttg