Jungle Viral Video: मैत्रीसाठी काही पण, असा डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल. याचे दाखले आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो. या ठिकाणी आपल्याला माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची मैत्रीदेखील पाहायला मिळते. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल, जिचा एकही मित्र नाही. मैत्री हे एक असे नाते आहे, जे रक्ताचे नाते नसले तरी त्यात प्रेम आणि आपुलकी असते. अनेकदा मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्यांपेक्षा खूप घट्ट असते. मग ती मैत्री माणसांची असो किंवा प्राण्यांची, या नात्यामध्ये नेहमीच आपलेपणा पाहायला मिळतो. अशाच एका अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियामुळे सतत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या डुक्कराची त्याचा मित्र कशी सुटका करतो हे पाहायला मिळत आहे.

Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Rumors of bombs on planes due to a minor boy tweet Mumbai
अल्पवयीन मुलाच्या ‘ट्वीट’मुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा; मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटा संदेश केल्याचे उघड
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून दोन डुकराची पिल्ले जात असून यावेळी अचानक तिथे बिबट्या येतो आणि त्यातील एका डुकराला आपल्या जबड्यात पकडतो. आपल्या मित्राला बिबट्याने पकडलेलं पाहून दुसरे डुक्कर तिथून पळून न जाता त्याच्याकडे पाहत उभा राहतो. यावेळी अचानक बिबट्या जबड्यात पकडलेले डुक्कर मरण पावले असे समजून त्याला सोडून दुसऱ्या डुकराच्या पाठीमागे धावतो. पण, यावेळी बिबट्याची फजिती होते. ते दोन्ही डुक्कर खूप दूर पळून जातात, त्यामुळे बिबट्याच्या हाती काहीच लागत नाही. या व्हिडीओतून एका डुकराने दुसऱ्या डुकराला वाचवण्यासाठी वापरलेल्या युक्तीचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत.

हेही वाचा: याला म्हणतात डान्स! ‘नऊवारी साडी पाहिजे’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीने केला हटके डान्स; Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shamad9122 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत २० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘जास्त मिळवण्याची हाव नेहमीच घात करते’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘त्याने मित्राचा जीव वाचवला’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मित्राचं प्रेम.’