Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमीच अनेक विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये कधी थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असतो, तर कधी मनोरंजन करणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असतो. असे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात दोन निरागस भाऊ-बहीण सुंदर रील करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
सोशल मीडियावर लोक विविध पद्धतीचा कंटेन्ट शेअर करतात. कधी ब्लॉग, तर कधी रील अशा विविध स्वरूपांतील कंटेन्टद्वारे लोक अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात; ज्यात बऱ्याचदा त्यांच्या खासगी आयुष्यातील दिनचर्यादेखील ते शेअर करतात. अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून हल्लीची लहान मुलंही ब्लॉगिंग करायला शिकत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, ज्यात ब्लॉगिंग करता करता दोन भावंडं भांडताना दिसत आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही लहान मुलांचे वडील ब्लॉग बनवत असून, यावेळी त्या दोन्ही भाऊ-बहिणीमध्ये भांडण सुरू होतं. भांडण सुरू झाल्यावर त्यांचे वडील ब्लॉगमध्ये त्यांच्या भांडणाचे कारण सांगताना दिसत आहेत. पुढे ती दोन्ही मुलं एकमेकांबरोबर मारामारी करायला सुरुवात करतात.
हेही वाचा : ‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @avi.rashi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, यावर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने लिहिलंय, “बापरे यांच्यात महाभारत सुरू झालं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, “मी पण माझ्या बहिणीबरोबर असंच भांडतो”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “त्याची बहीण खूप आगाऊ आहे”