सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची कुठली ना कुठली कामे सतत फोनशी जोडलेली असतात. त्यामुळे फोनशिवाय राहणे अनेकांना कठीण जाते. सतत फोन वापरण्याची सवय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच लागली आहे. त्यामुळे फोन आणि इतर डिजिटल उपकरणांपासून स्वतःला दूर ठेवणे कठीण झाले आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक तरुणी मेट्रोत फोन बघण्यात व्यग्र असते तेव्हा अज्ञात व्यक्ती येऊन तिचा फोन हिसकावून घेऊन जाताना दिसते.

मेट्रो एका प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि तिचे दरवाजे उघडताच सर्व प्रवासी त्यात चढतात. मेट्रोच्या आत गर्दीमुळे काही प्रवाशांना दाराजवळही उभे राहावे लागत आहे. मेट्रोच्या दारात उभी असलेली एक तरुणी तिच्या फोनमध्ये काहीतरी बघत असते. बाहेर उभी असलेली एक व्यक्ती तिच्यावर लक्ष ठेवून असते आणि जेव्हा मेट्रोचा दरवाजा बंद होऊ लागतो अगदी त्याच क्षणाला ही व्यक्ती तरुणीच्या हातातील फोन घेऊन निघून जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

हेही वाचा…‘काय कल्पना आहे!’ लहान मुलांना नीटनेटकेपणा शिकवणारा तो VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले प्रभावित…

व्हिडीओ नक्की बघा :

अनेक जणांना प्रवासादरम्यान फोनमध्ये व्यग्र राहण्याची सवय असते. त्यामुळे अनेक चोरटे या संधीचा फायदा घेतात आणि फोन किंवा तुमच्या अनेक मौल्यवान वस्तू घेऊन निघून जातात. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मेट्रोचे दार बंद होऊ लागतात तेव्हाच बरोबर व्यक्ती तरुणीच्या हातातील फोन हिसकावून घेते. मग दरवाजा बंद होतो. त्यानंतर तरुणी मेट्रोत आणि अज्ञात व्यक्ती मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर फोन घेऊन उभी राहते आणि अशा परिस्थितीत तरुणी काहीच करू शकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @veergurjarpage या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो प्रवाशांना सतर्क करण्यासाठी बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ जरी स्क्रिप्टेड असला तरीही त्यातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच काही जण त्यांच्याबरोबर घडलेल्या अशा काही चोरीच्या घटना कमेंट्समध्ये सांगताना दिसले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Story img Loader