Viral Video : आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहेत, ज्यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आई वडील आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी झटतात. त्यांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करतात पण अनेकदा मुलांना आईवडीलांचे महत्त्व कळत नाही. मुले मोठे झाल्यावर आईवडीलांना गृहीत धरायला लागतात पण त्याच वेळी आईवडीलांना मुलांची सर्वात जास्त गरज असते. (Who will understand the pain of parents a child told two benefits of giving time to parents viral poster video)
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला हातात पोस्टर घेऊन आईवडीलांना वेळ देण्याविषयी विनंती करत आहे. या पोस्टरवर त्याने आईवडीलांजवळ बसण्याचे दोन फायदे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला हातात पोस्टर घेऊन उभा दिसेल. या पोस्टरवर त्याने हिंदीमध्ये आईवडीलांवर आधारीत संदेश लिहिला आहे. पोस्टरवर लिहिलेय, “माँ बाप के पास बैठने के दो फायदे है, आप कभी बडे नही होते और माँ बाप कभी बूढे नही होते.” (आई वडीलांजवळ बसण्याचे दोन फायदे आहेत. आपण कधी मोठे होत नाही आणि आई वडील कधी वृ्द्ध होत नाही.) चिमुकल्याच्या हातातील हे पोस्टर पाहून येणारे जाणारे लोक त्यावर लिहिलेल्या संदेशाला सहमती दर्शवत आहे.
हेही वाचा : एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
पाहा व्हायरल व्हिडीओ
shauryachauhan2507 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तू मला रडवले” तर एका युजरने लिहिलेय, “खरं आहे भावा तुला तुझ्या आईवडीलांचे प्रेम मिळो” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई वडील असल्यावर त्यांची किंमत कळत नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हातात पोस्टर किंवा पाटी घेऊन उभे असणाऱ्या अनेक तरुणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या पाट्यांवर किंवा पोस्टरव कधी मजेशीर मेसेज तर कधी भावुक करणारे मेसेज लिहिलेले दिसतात.
.