Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये हत्तीच्या मस्तीचे, गोंधळाचे अनेक व्हिडीओ आपण आतापर्यंत पाहिले आहेत. हत्ती तसा शांत प्राणी मात्र त्याला राग आला तर कहर होणार हे नक्की. अशाच एका रागीट हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात भर बाजारपेठेत एका जंगली हत्तीनं चांगलाच धुमाकूळ घातलाय..हत्तीने अचानक मारलेल्या एन्ट्रीनं बाजारपेठेत सगळ्यांचीच धांदल उडाली. सुरुवातीला शांतता असणाऱ्या ठिकाणी अचानक हत्ती येतो आणि पार्क केलेली स्कूटर अक्षरश: फूटबॉलसारखी उडवतो. हत्तीनं आपल्या मार्गात आलेल्या दुचाकीला उडवून पायाखाली ठेचले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
The elephant stopped the cub approaching the strangers
“आई तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही…” अनोळखी लोकांजवळ जाणाऱ्या पिल्लाला हत्तीने अडवलं; VIDEO पाहून नेटकरीही भारावले

अन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली स्कूटर

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की एक स्कूटर भर बाजारपेठेत एका मेडीकलच्या समोर पार्क केली आहे. या मेडीकलमध्येही लोकांची रांग लागली आहे. दरम्यान परिसरात सर्वत्र शांतता असताना हत्ती एन्ट्री करतो आणि सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळू लागतात. त्यावेळी हत्ती येतो पार्क केलेल्या स्कूटरला उडवून लावतो आणि तिथून पुढे जातो.

हे ही वाचा<< ‘ती’ घाबरून विनवण्या करत होती पण ‘तो’ अश्लील.. भररस्त्यात पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, Video व्हायरल

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत असून आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान नेटकरी या व्हिडीओची तुलना 1995 मधील अमेरिकन जुमांजी चित्रपटाशी करत आहेत. तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Story img Loader