आई आणि मुलांचं नातं फार गोड असतं. आपल्या मुलासाठी ती आई काहीही करायला तयार होते तर आपल्या आईला जरासं काही झालं तरी त्या मुलाचा जीव कावराबावरा होतो. अतिशय अतूट अशा नात्यांपैकी एक नातं हे आई आणि मुलाचं मानलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मग प्राणिजगतही त्याला अपवाद नाही. प्राण्यांना फक्त बोलता येत नसलं तरी प्राणिजगतातल्या आई आणि तिच्या पिल्लांमध्ये असणारं अतूट नातं त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून प्रतीत होतं.

घोडे हे पाळीव प्राणी म्हणून मानले जात असले तरी घोड्यांची प्रजाती ही मूळची वन्य या प्रकारात मोडणारी आहे. हे जंगली घोडे कोणाच्याही मालकीचे नसतात आणि त्यांचंत्यांचं मुक्त जीवन ते जगत असतात.

इंग्लंडमधल्या एका गवताळ भागात एक वन्य घोडी आणि तिच्या पिल्लाबाबत घडलेल्या या घटनेने आई आणि मुलामधलं प्रेमाचं नातं स्पष्टपणे समोर आलं.

आपल्या पिल्लासोबत या भागातून जात असताना ठेचकाळून हा घोडीचा एक पाय तिच्याच आयाळीमध्ये अडकला. ही घोडी त्यामुळे जमिनीवर पडली आणि तिला उठता येईनासं झालं. तिचं छोटंसं पिल्लू आपल्या आईची ही स्थिती पाहून कावरंबावरं झालं. आणि तिची सुटका करायचा प्रयत्न करू लागलं पण त्या एवढ्याशा जिवाला या घोडीला सावरणं कठीण जात होतं. त्यामुळे केविलवाण्या अवस्थेत ओरडत राहण्यापलीकडे त्याच्याकडे कोणताच दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता.

सुदैवाने या भागातून प्राणिमित्र संघटनेचे काही सदस्य जात होते. या पिल्लाचा आवाज एेकल्यावने त्याच्याकडे या सर्वांचं लक्ष गेलं. या सगळ्यांनी या घोडीची अलगद सुटका केली. आणि ही आई तिच्या मुलासोबत आपल्या मार्गाने चालू लागली.

ही संपूर्ण घटना या सगळ्यांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे.. पाहा हा व्हिडिओ

सौजन्य-यूट्यूब