Viral video: आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करण्याकरिता काही जण कोणत्या तरी खास जागेची निवड करतात; जेणेकरून तो क्षण आणि ती जागा आयुष्यभर आपल्या आठवणीत राहील. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे; ज्यामध्ये एका पायलटने फ्लाइटमध्ये सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. पायलटची ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाहून प्रवासीही मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागले.

या पायलटचे नाव कॉनरॉड हँक असून, या व्हिडीओच्या सुरुवातीला फ्लाइट सुरू होण्यापूर्वी तो ही घोषणा करताना दिसत आहे. “आजच्या या फ्लाइटमध्ये एक अतिशय खास व्यक्ती आहे आणि मला ठाऊक आहे की, हे सर्व तिच्यासाठी अनपेक्षित आहे. लेडीज अॅण्ड जेंटलमन, ही नोकरी करताना जवळपास दीड वर्षापूर्वी मला एक खूप सुंदर व्यक्ती भेटली; जिच्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं,” असे तो त्या घोषणेतून सांगतो. पुढे तो पायलट, “तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तू माझे स्वप्न आहेस. त्यामुळेच मला तुझी एक मेहेरबानी हवी आहे. हनी, तू माझ्याशी लग्न करशील का?” असे म्हणत सर्वांसमोर हातात फुलांचा गुच्छ आणि अंगठी घेऊन गुडघ्यावर बसतो.

reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
Suraj Chavan
Video : सूरज चव्हाणला पाहून शाळेतली विद्यार्थिनी झाली भावुक; मिठी मारत म्हणाली, “मला तुला भेटायचं…”
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life
आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले आईवडील , लेकाने केले स्वप्न पूर्ण; VIDEO होतोय व्हायरल
Husband wife dance video
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

हेही वाचा : “अरे हिच्या नावातच समस्या” वधू-वराच्या नावाचा व्हायरल PHOTO पाहून युजर्सला हसू आवरेना; म्हणाले….

पाहा व्हिडीओ :

त्यानंतर फ्लाइट अटेंडंट असलेली पॉला धावत येते आणि पायलटला मिठी मारते. यावेळी ती उत्तर सांगताना म्हणते, “मला माहीत नाही की, अंगठीसाठी हा योग्य हात आहे.” त्यानंतर ती ‘हो’ असे उत्तर देते आणि पायलट तिच्या बोटात अंगठी घालतो. या दोघांचे प्रेम पाहून फ्लाइटमधील सर्व प्रवासी मोठमोठ्याने टाळ्या वाजवीत त्यांना शुभेच्छा देतात.

हा व्हायरल व्हिडीओ पोलंडचा असल्याचे म्हटले जात असून, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. लॉट पोलिश एयरलाइन्स कंपनीकडून हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्युज मिळाल्या असून, १४,००० पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत.

Story img Loader