तुम्ही जर संगीत प्रेमी असाल, तर तुम्ही कोक स्टुडिओ सीझन १४ मधील ‘पसुरी’ हे ट्रेंडिंग गाणे ऐकले असेलच जे जगभरात लोकांच्या मनावर राज्य करतंय. अली सेठी आणि शे गिल या पाकिस्तानी कलाकारांनी गायलेले हे सुंदर गाणे सर्व संगीत प्रेमींना वेड लावत आहे आणि या गाण्याच्या मधुर संगीतामुळे जगभरातील लाखो लोक या गाण्यात रमताना दिसून येत आहेत. सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्यांपर्यंत सर्वांवर या गाण्याची जादू पसरलीय. हेच गाणं एका मुलीने किचनमध्ये काम करता करता गायल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सहसा कांदा चिरल्याने लोक रडतात, पण ही मुलगी गाणं गुणगुणताना अश्रूंनी गाळत कामाचा आनंद घेताना दिसतेय.
पसुरी या गाण्याने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक जण हे गाणं आपआपल्या पद्धतीने कुणी गाणे गाताना तर कुणी यावर रील्स व्हिडीओ बनवताना दिसत आहे. झारखंडची गायिका शालिनी दुबे हिला सुद्धा या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आला नाही. किचनमध्ये जेवणासाठी कांदा कापत कापत तिने हे गाणं आपल्या हटके स्टाईलमध्ये गायलंय. तिच्या बहिणीने रेकॉर्ड केलेल्या रीलमध्ये शालिनीने हे गाणे एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे तिच्या मधुर आवाजात गाताना दिसतेय.
आणखी वाचा : हत्तीचा वाढदिवस! अशा अनोख्या स्टाईलमध्ये गजराजने मानले आभार, VIRAL VIDEO पाहून आनंद महिंद्रा सुद्धा फिदा!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या रिक्षातून बाळ रस्त्यावर पडलं, अन् जीव धोक्यात घालून ट्रॅफिक पोलिसाने वाचवले प्राण
हा व्हिडीओ शालिनी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय. व्हिडीओ पाहणारे प्रत्येक जण तिच्या मधूर आवाजाच्या प्रेमात पडू लागले आहेत. हा व्हिडीओ १६ मे रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला २१ मिलियन इतक्या लोकांनी पाहिलंय. तर ३ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केलंय. अनेक युजर्सनी तिच्या गोड आवाजाचं कौतुक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’ने आकाशात उंचावर उडी घेत केला स्टंट पण…; खतरनाक VIDEO VIRAL
एका यूजरने लिहिले की, ‘तुमचा आवाज स्वर्गासारखा आहे. तुम्ही त्या गाण्याचे रिमिक्स किंवा फिमेल व्हर्जन का बनवत नाही.’ आणखी एका इन्स्टाग्राम यूजरने लिहिले की, ‘मला आधी वाटले की हे बॅकग्राऊंड म्यूझिक आहे. नंतर मला कळलं की हा खराखुरा आवाज आहे. हे अद्वितीय आहे.’