Shocking video: सोशल मीडियावर घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होणारच. मात्र घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की,पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात. अशाच एका जोडप्याला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे ते म्हणजे, “मर्द को दर्द नाही होता?’ हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील पन्ना येथील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ नवऱ्यानं एका छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला आहे. लग्नानंतर त्याची पत्नी, सासू आणि मेहुणे पैसे आणि सोने-चांदीचे दागिने मागू लागले असा दावा त्या व्यक्तीने केला आहे. त्याने नकार दिल्यावर त्यांनी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. पत्नीकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे सांगत पीडितेने पोलिसांची मदत मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० मार्च रोजी घडली आणि सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाली. व्हिडिओमध्ये, हा तरुण लोकेश हात जोडून दयेची याचना करत असताना त्याची पत्नी त्याला अनेक वेळा चापट मारताना दिसत आहे. तर दुसरी एक महिला तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती ऐकत नाही. ती लोकेशच्या तोंडावर लाथ मारते आणि त्याच्या कॉलरला पकडून त्याला मारहाण करत राहते. दरम्यान त्याने पोलिस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला आणि तिच्याकडून संरक्षणाची विनंती केली.या घटनेनंतर लोकेशने सतना कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने असेही सांगितले की त्याने आपल्या पत्नीच्या अत्याचाराचे सत्य उघड करण्यासाठी त्याच्या घरात कॅमेरा बसवला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
लोकेशने खुलासा केला की त्याने जून २०२३ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार हर्षिता राईकवारशी लग्न केले. तथापि, लग्नानंतर लगेचच त्याची पत्नी, सासू आणि मेहुणे पैसे आणि सोने-चांदीचे दागिने मागू लागले. त्याने नकार दिल्यावर त्यांनी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. लोकेशने सांगितले की त्याने हुंडा न मागता एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न केले होते, तरीही त्याच्या सासरच्या लोकांकडून त्याचा छळ होत होता.
पाहा व्हिडीओ
लोकेशने पोलिसांकडे त्याच्या पत्नीच्या हिंसाचारापासून वाचवण्याची विनंती केली असून अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, या व्हिडिओवर नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “मर्द को दर्द नाही होता?” तर अनेकांनी या महिलेवर कारवाईची मागणी केलीय.