Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. थरकाप उडवणाऱ्या अपघाताचे, विविध घटनांचे व्हिडीओ क्षणार्धात काळजाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
समाजमाध्यमांवर नेहमीच रेल्वे अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेकदा तत्परतेमुळे अपघात होणाऱ्या व्यक्तीचा बचाव होतो. आतादेखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?
हा व्हायरल व्हिडीओ जळगाव स्थानकावरील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला सामानाची बॅग घेऊन रूळ ओलांडताना दिसत आहे. परंतु, यावेळी तिला प्लॅटफॉर्मवर पटकन चढता येत नाही. इतक्यात समोरून एक गाडी येताना दिसते. पुढे काहीतरी अघटित घडणार एवढ्यात आरपीएफ रेल्वे दलाचे जवान धावत येतात. परंतु, तेवढ्यात गाडीची धडक महिलेला बसते आणि महिला गाडीबरोबर फरफटत जाते. आरपीएफ रेल्वे दलाचे जवान धावत जाऊन त्या महिलेला पटकन बाहेर काढतात. यावेळी स्थानकावरील उपस्थितीत जवान महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करतात.
हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Ajit Singh Rathi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “हा सीसीटीव्ही व्हिडीओ जळगाव रेल्वेस्थानकाचा आहे. सावधगिरी न बाळगता रूळ ओलांडणारी एक महिला मालगाडीला धडकली, गाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये चिरडली गेली आणि अशा संकटातही रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला कसे वाचवले, हे पाहण्यासारखे आहे”, असे लिहिण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओला आतापर्यंत सात हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “तिला वाचवणारा व्यक्ती देवस्वरूप आहे.” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “लोक घाई करायच्या नादात स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “त्या पोलिसवाल्याला माझा सलाम.”