भारतातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्याचे दिवस असह्य असतात. त्यामुळे काही दिवस उकाड्याला हरवण्यासाठी आणि थंडीपासून बचावासाठी अनेक जण डोंगराळ भागात येतात. तिकडची ताजी हवा आणि मनमोहक दृश्ये यांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याने पर्वतरांगा आपोआपच लोकांना आनंदित करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हिमाचल प्रदेशमधले पर्वत इतके सुंदर आहेत की एखाद्याला तिथे जाऊन दिलखुलासपणे नाचण्याचा मोह आवरता येत नाहीय. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य पर्वतांमध्ये बॉलीवूड गाण्यावर नाचताना आणि मजा करताना दिसत आहे.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडीओ हिमाचल प्रदेशच्या रोहतांग पासवर शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये टीव्ही अभिनेत्री आंचल गोस्वामी सुंदर बर्फाच्छादित पर्वतांमध्ये ‘जब वी मेट’च्या ‘ये इश्क हाय, जन्नत दिखाए’ या गाण्यावर अगदी मनमोकळ्यापणाने नाचताना दिसत आहे. हे गाणे मुळात करीना कपूरवर चित्रित करण्यात आलं होतं. आंचलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “ये इश्क हाय जन्नत दिखाए, और मेरे जैसे लाखों नहीं मेरे जैसी मै एक ही हूं, फील्स”.असं या कॅप्शनमध्ये लिहिलंय. 

आणखी वाचा : शेतकरी रॅंचो! ‘जुगाड’ गहू कापणी यंत्र तयार केले; पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘या’ ठिकाणी झाला जगातला रेकॉर्डब्रेक पाऊस, कोणतं आहे ठिकाण, इतक्या पावसात कसं दिसतं दृश्य? पाहा हा VIRAL VIDEO


हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ३० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिचा हा भन्नाट डान्स पाहून लोक तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. एका यूजरने लिहिले की, “सुंदर राजकुमारी, तर दुसऱ्याने कमेंट केली,”प्रिय खूप गोड आणि गोंडस आहे.” या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शन प्रशंसा, अनेक हार्ट इमोजींनी भरलेला आहे.

Story img Loader