लग्नात डान्स करुन लोकांचं मनोरंजन करणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे.सोशल मीडियावर असे रोज व्हिडीओ पाहायला मिळतात.चांगल्या डान्सचे व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात असं अनेकदा सोशल मीडियावर दिसून आलं आहे. लग्नात लोकं अनेकदा विचित्र डान्स करीत असताना पाहायला मिळतात.देशभरातील लग्नात डान्स केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.लग्न असो वा आणखी कोणता सोहळा, डान्स तर झालाच पाहिजे. कोणत्याही कार्यक्रम आजकाल डान्स झाल्याशिवाय अपूर्णच मानला जातो. लग्न सोहळ्यात खास संगीतचा कार्यक्रम ठेवायचा ट्रेंड देखील पहायला मिळतोय.त्यामध्ये नागिन डान्स अधिक प्रसिद्ध आहे. असाच एक नागीन डान्स केलेल्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
महिलेचा नागीन डान्स झाला व्हायरल –
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘मैं नागिन तू सपेरा’ या गाण्यावर एक महिला फरशीवर नागिन सारखीच नाचत आहे, तर दुसरी महिला बीन वाजवत तिची साथ देत आहे. दरम्यान एक महिला तिला जमीनीवरुन उठवतानाही दिसत आहे. महिलेचा फरशीवर लोळत डान्स पाहून समारंभातील सर्वच लोक थक्क झाले. सोशल मीडियावर असे हटके आणि भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांचं यामुळे मनोरंजन होतं, आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: लग्नात चक्क कुत्र्यानं घातली शेरवानी, नवरीच्या विदाईलाही झाला भावूक
neha_ankit26 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनाही या व्यक्तीची डान्स स्टेप आवडली असून नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हसून हसून लोलपोट व्हाल.