Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही विविध प्रकारचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना, तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; ज्यात एक महिला माकडाबरोबर मस्ती करताना दिसतेय. पण, यावेळी अचानक माकड तिच्याबरोबर असं काहीतरी करतो, जे पाहून नेटकरी अवाक् झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक जण कुत्रा, मांजर या प्राण्यांना खूप जीव लावतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला माकडाचे लाड पुरविताना दिसतेय. पण, यावेळी ती त्याच्याबरोबर मजा-मस्ती करतानाही दिसतेय. माकडाला महिला करीत असलेली मस्ती आवडत नाही. त्यामुळे तो चिडून तिच्याबरोबर असं काहीतरी करतोय, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला माकडाबरोबर मस्ती करीत आहे. पण, अचानक ते माकड तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ते तिच्या मांडीवर येऊन बसते. पुढे ती महिला माकडांना खायला देताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ६० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सही करीत आहेत.

हेही वाचा: फणा काढलेल्या नागाला गाईनं प्रेमानं चाटल्यानंतर नागानं केलं असं काही… VIDEO पाहून व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, “बापरे! माकड चावेल ना.” दुसऱ्या युजरने लिहिलेय की, “अरे बापरे, याला म्हणतात हिंमत.” आणखी एकाने लिहिलेय की, “कशाला उगाच एक रिस्क घ्यायची.” आणखी एकाने लिहिलेय की, “जय श्रीराम, हनुमानभक्त.”