दोन मिनिटात झटपट होणारी ‘मॅगी’ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच आवडीची आहे. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले. पण, मॅगी ही सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. अनेक जण सकाळचा नाश्ता म्हणून तर रात्री २ वाजता भूक लागते म्हणून दोन मिनिटात तयार होणाऱ्या या मॅगीला प्राधान्य देतात. तर आज सोशल मीडियावर मॅगीप्रेमींसाठी एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, महिला मॅगी थीमच्या केकला फिनिशिंग देत आहे. एका वाडग्याप्रमाणे केकचा बेस तयार करून घेतला आहे. त्यावर पिवळ्या रंगाच्या केकचा लेअर आहे आणि सगळ्यात खास गोष्ट अशी की, केकवर मॅगी दिसण्यासाठी महिलेने केकमध्ये छोटीशी काठी रोवली आहे आणि त्यावर काटा चमचा लावून घेतला आहे. तसेच प्लास्टिकच्या पिशवीत पिवळ्या रंगाची क्रीम भरून त्या चमच्यावरून ही क्रीम अशाप्रकारे सोडते आहे की, ते अगदी नूडल्सप्रमाणे दिसत आहेत.
हेही वाचा…पाण्यासाठी महिलांची धडपड! नाईलाजास्तव लाकडावरून ओलांडला रस्ता; पाहा VIRAL VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला क्रीमच्या मदतीने पूर्ण केकवर नूडल्सची डिझाइन तयार करून घेते, जी हुबेहूब मॅगीप्रमाणे दिसते आहे. तसेच मॅगीमध्ये वाटाणे, गाजरसुद्धा घातले जाते. यामुळे महिला हिरव्या आणि केशरी रंगाची क्रीम घेऊन त्यात वाटाणे आणि गाजराचे छोटे-छोटे तुकडे केकमध्ये डिझाइन करताना दिसत आहे; जे पाहून तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gokulkitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर नेहमीच अनोख्या डिझाइन असलेले केक तयार करत असतात आणि सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत असतात. नेटकरी हा व्हिडीओ पाहून महिलेच्या कौशल्याचे आणि त्यांच्या मॅगी केक बनवण्याच्या या खास कल्पनेचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.