Viral Video: संगीताच्या दुनियेत वाद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायकाच्या मनातील भाव स्पष्ट आणि थेटपणे व्यक्त करण्यासाठी जणू काही ही वाद्ये जन्माला आली, असे म्हणायला हरकत नाही. वीणा, पेटी, तबला या वाद्यांच्या ठेक्यावर गाणे सादर करण्यात आणि ऐकण्यात अनेक जण मंत्रमुग्ध होऊन जातात. आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्राचीन व दुर्मीळ जलतरंग या वाद्यावर एक महिला गाणे सादर करताना दिसली आहे.

ती महिला जलतरंग वाद्यावर ‘आयगिरी नंदिनी’ हे स्तोत्र सादर करताना दिसली आहे. जलतरंग हे जगातील सर्वांत जुने वाद्य आहे. जल या शब्दाचा अर्थ पाणी आणि ‘तरंग’ म्हणजे पाण्यावर निर्माण होणारे तरंग किंवा लाटा. या वाद्याचा उगम १७ व्या शतकात झाला, असे मानले जाते. त्याला जलयंत्र असेही म्हणतात. जलतरंग वाजविताना पाण्याने भरलेले विविध आकारांचे ग्लास, कप, बाऊल यांचा उपयोग केला जातो. जलतरंग वाद्यावर सादर केलेले स्तोत्र एकदा तुम्हीसुद्धा ऐका.

How to look at Manusmriti and the Caste System
Manusmriti and the Caste System मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेकडे कसे पाहावे? देवदत्त पट्टनायक यांच्यासह भारतीय संस्कृती आणि कलेचा घेतलेला आढावा!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pune Kasba Peth Ganesha Temple Gundacha Ganpati
Pune : कसबा पेठेतील ‘या‘ मंदिराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध मंदिराची रंजक गोष्ट
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…

हेही वाचा…ग्राहक बनून दुकानात शिरल्या अन्… महिलांची चोरी CCTV मध्ये कैद, पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, महिलेने पाण्याने भरलेले विविध आकारांचे काचेचे बाऊल वर्तुळाकार ठेवले आहेत. ती महिला या बाऊलवर दोन काठ्यांच्या मदतीने आयगिरी नंदिनी स्तोत्र वाजविण्यास सुरुवात करते. जलतरंग या वाद्याच्या मदतीने सादर करण्यात आलेले हे स्तोत्र ऐकून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल आणि हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.

प्राचीन भारतीय धर्मग्रंथातील ‘आयगिरी नंदिनी’ हे एक महिषासुर मर्दिनी स्तोत्र आहे. हे स्तोत्र देवी दुर्गा देवीला समर्पित आहे आणि ते महिषासुराचा पराभव करण्यासाठी देवी दुर्गाच्या पराक्रमाची आणि सामर्थ्याची स्तुती करते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @routes2rootsngo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये जलतरंग वाद्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध पद्धतींनी आपल्या संस्कृतीचे वर्णन करताना दिसत आहेत. तर एका युजरने, “भारतीय शास्त्रीय संगीत किंवा नृत्याची माहिती ही वारशाचा भाग म्हणून आमच्या मुलांच्या अभ्यासक्रमात असली पाहिजे”; अशी कमेंट केली आहे.