टेक्नाॅलाॅजीमध्ये प्रगती झाली. जवळपास सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन, टॅबलेट आले. टेक्नाॅलाॅजीचा वापर करत आपलं आयुष्य चांगलं झालं. स्वत:ला व्यक्त करण्याचं एक मोठं माध्यम प्रत्येकाच्या हातात आलं. पण त्याचवेळेस विचित्र गोष्टी घडू लागल्या आहेत. व्हिडिओ रेकाॅर्डिंगच्या नादात आपण आपलं माणूसपण घालवून बसलो आहे का असा प्रश्न विचारला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कृष्णवर्णीय महिला एका उंच बिल्डिंगच्या बाल्कनीला लोंबकळत असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ घेणारीही एक महिला असल्याचं लक्षात येतं. बाल्कनीला बाहेरच्या भागात फक्त एका हाताने लोंबकळत असलेल्या या कृष्णवर्णीय महिलेला वाचवण्याचा ही बाई कोणताच प्रयत्न करत नाही. उलट या बाईचा व्हिडिओ ती बाई काढत राहिली. बाल्कनीवर लोंबकळणारी त्या कृष्णवर्णीय बाईचा हात सुटून ती खाली पडते तरीही या पहिल्या बाईचं शूटिंग काही थांबत नाही.

पुढचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा

ही घटना कुवेतमधली आहे. आणि हा व्हिडिओ काढणारी बाईच्या घरी ही कृष्णवर्णीय बाई मोलकरीण म्हणून काम करते.
पण कोणीही का असेना. मृत्यूच्या दारात असणाऱ्या एका व्यक्तीला मदत करणं सोडून त्याचं व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्याची ही कोणती प्रवृत्ती? स्मार्टफोन्सच्या युगातएवढा क्रूरपणा आपल्यामध्ये खरोखर आला आहे? एखादी घटना घडल्यावर त्याचा व्हिडिओ काढणं आपण समजू शकतो. त्या व्हिडिओचा वापर अनेकदा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी केला जातो. अशा वेळेस टेक्नाॅलाॅजीचा वापर करणं योग्य असतं. पण आजकाल एखादी सनसनाटी घटना घडल्यावर  तिथे संकटात असलेल्या त्या व्यक्तीला मदत करण्याएेवजी त्याचा व्हिडिओ काढण्यात आपल्यापैकी अनेकजण गुंगलेले असतात.

स्मार्टफोनच्या वापर आपलं जीवन सुखकर होण्यासाठी करण्यात येणं अपेक्षित असताना या टेक्नाॅलाॅजीमुळे आपण एवढे पाषाणहृदयी होणार असू तर या सगळ्या सोयींचा काय उपयोग याचा अंदाज घेणं गरजेचं आहे.

[jwplayer vvXN0P2e]