अनेक प्राणी प्रेमी कुत्रा मांजर पाळतात. त्याचा कुत्रा-मांजर कधी हरवला तर हे प्राणीप्रेमींसाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. पण कल्पना करा तुमचा पाळीव प्राणी हरवला आहे आणि त्याचा आवाज तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीमधून येत असेल तर… कोणालाही वाटेल तुम्हाला ला भास होत आहे. तुम्ही कोणाला सांगितले तर त्यांना वाटेल पाळीव प्राणी गमावल्याच्या दुखामुळे तुम्हाला धक्का बसला आहे. एका महिलेसह असेच काहीसे घडले. पण भितींमधून येणारा मांजराचा आवाज तिच्यासाठी भास नव्हे तर वास्वत होते. एक महिलेच्या घराच्या भिंतीमध्ये खरोखर मांजर अडकले होते. खरं तर घराच्या दुरुस्तीदरम्यान चुकून मांजर भिंतीमध्ये अडकली होती. मांजरीला बाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जे नावाच्या व्यक्तीने TikTok वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहेले की, “मला खरोखर विश्वासच बसत नाही की मेंटेनन्स टीमने माझ्या मांजरीला भिंतीमध्ये कैद केले! मला खूप वाईट वाटते की ती खूप घाबरली होती.”

हेही वाचा – “याला म्हणतात भक्ती!”, शनिदेवाच्या मंदिरात मूर्तीला प्रदक्षिणा घालत्येय ही मांजर; Viral Video पाहून लोकांना विश्वास बसेना

किंग ऑफ प्रिशियामध्ये ही घटना घडली आहे. जे घरी परतल्यावर तिच्या घराच्या भिंतींमधून आतमध्ये काहीतरी हलचाल होत असल्याचा आणि ओरघडण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. तिची मांजर अडकल्याचे लक्षात येताच तिने तातडीने मेंटेनन्स इमर्जन्सी लाइनची मदत घेतली.

त्यांच्या सल्ल्यानुसार, जेने तिच्या मांजरी वाचवण्यासाठी एक मिशन सुरू केले. व्हिडीओमध्ये तिचे अथक प्रयत्न दिसत आहेत कारण ती भिंतीमध्ये एक छिद्र करते आणि अडकलेल्या मांजरीला सोडवण्याचा प्रयत्न करते. ती प्रयत्न करत राहते. काही क्षण तणाव निर्माण होतो, शेवटी, प्लास्टरमधून मांजरीचा पंजा बाहेर पडतो. दृढनिश्चयाने मांजरीला बाहेर पडण्यासाठी पुरेसे अंतर होईपर्यंत जे भिंतीला छिद्र पाडणे सुरु ठेवते. “मी मांजरीलाबाहेर काढल्यानंतर मला खूप समाधान वाटले. माझी मांजर ही माझ्या मुलासारखी आहेत,” असंही ती कॅप्शनमध्ये भावनिकरित्या शेअर करते.

हेही वाचा – “Google Is Wrong”, गुगल मॅप वापरणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानिकांनी लावला फलक; पाहा Viral Photo

भिंतीमध्ये अनेक तास अडकून राहूनही, मांजर चमत्कारिकरित्या असुरक्षितपणे बाहेर पडते, जे तिच्या लवचिकतेचा आणि तिच्या बचावासाठी जेच्या अटल समर्पणाचा पुरावा आहे. व्हिडिओ नेटिकऱ्यांचे मन जिंकले आहे.

Story img Loader