Viral Video: सध्या उन्हाळा असल्याने थंडगार पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही ठिकाणी तापमान आधीच ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे यादरम्यान दुकानात व बाजारात थंडगार पेय, फ्रिज, माठ, एसी, कूलरची मागणी ग्राहकांकडून वाढलेली दिसून येते. कडक उन्हात लोक थंडगार पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. शहरात थंडगार पिण्याचे पाणी सहज मिळून जाते. कारण – आपल्यातील अनेक जण फ्रिजचा उपयोग करतात. पण, काही लोकांसाठी फ्रिज घेणं हे सुद्धा एक स्वप्न असते. अनेक जणांना फ्रिज विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते.तर आज सोशल मीडियावर एक महिलेनं गावाकडे कशाप्रकारे पाणी थंड करण्यात येते त्याचे सिक्रेट सांगितलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिव्या सिन्हा नावाच्या महिलेने या कडक उन्हात थंडगार पाण्यासाठी फ्रिज न वापरता त्यांना थंड पाणी कसं करता येईल याचा हटके उपाय व्हिडीओत सांगितला आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की, त्यांनी पाणी थंड ठेवण्यासाठी माठ वापरत असतील तर तुम्ही चुकीचे आहात. कारण – येथे नैसर्गिक रित्या पाणी कसं थंड होतं हे दाखवलं आहे. एकदा व्हायरल व्हिडीओतून महिलेनं सांगितलेला हा उपाय पाहून तुम्ही थक्क व्हाल एवढं नक्की.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…खुल्या आकाशाखाली व्यायाम करण्यासाठी जुगाड; ‘त्याने’ बनवलेले ‘हे’ अनोखं ट्रेडमिल VIDEO तून पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून त्याला ओल्या कापडाने छान गुंडाळून घेतलं आहे. बाटली ओल्या कपड्याने गुंडाळल्यानंतर एका झाडाला लटकवली आहे आणि १० ते १५ मिनिटे तसंच ठेवून दिले आहे. ओल्या कपड्यामुळे आणि थंडगार हवेमुळे ये पाणी काही मिनिटांत थंड होऊन जाते असा दावा महिला करते आहे. अशाप्रकारे बाटलीतील पाणी फ्रिजचा वापर न करता नैसर्गिक रित्या थंडगार झाल्याचे महिला व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @divyasinha266 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत आणि हा अनोखा उपाय आपल्या घरातील फ्रिजलाही मागे टाकू शकतो ; असे म्हणताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत. याआधी सुद्धा असे अनेक जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, दिव्या सिन्हाने हा उपाय अगदी व्यवस्थित व्हिडीओत शूट करीत नेटकऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे महिलेची संवाद साधण्याची शैली अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

Story img Loader