जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. ज्यासाठी वेगवेगळे पोशाख परिधान केले जातात. क्रिकेटपासून फुटबॉल आणि कबड्डीपर्यंत विविध खेळांचे कपडे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचवेळी, बाइक रायडिंगपासून ते ट्रेकिंग आणि पर्वतांवर स्कीइंगपर्यंत लोक वेगवेगळ्या पोशाखात दिसतात. सध्या एक महिला हा ट्रेंड मोडताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीच हा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या महिलेने बर्फात स्कीइंग करत एक अनोखा रोकॉर्ड केलाय. तुम्ही म्हणाल बर्फात स्कीइंग काय नवीन नाही, मात्र यावेळी फक्त स्कीइंगची नाही तर तिच्या पोशाखाची चर्चा होत आहे. या महिलेला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नऊवारी नेसून बर्फात जबरदस्त स्टंट
आजकाल भारतीय स्त्रीया भारतीय परंपरेच्या पेहरावाला वेगळ्या पातळीवर प्रोत्साहन देत असून एक नवीन ओळख देत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये साडी घातलेली एक महिला बर्फाळ टेकड्यांवर स्कीइंग करताना दिसत आहे. या महिलेनं चक्क नऊवारी साडी घातली आहे, जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत. कारण स्कीइंग करताना खेळाडू वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतात.ही पहिलीच महिला असावी जी बर्फात फक्त नऊवारी साडी घालत नाही त्याच बरोबर स्कीइंगही करते. सोशल मीडियावर भारतीय संस्कृती जपल्याबद्दल नेटकरी तीचं भरपूर कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: ‘रसोडे में कौन था’ फेम यशराजचं नवीन गाणं ऐकलं का? अर्चना गौतमचा डायलॉग वापरत दिला भन्नाट ट्रॅक
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिव्या मैया नावाच्या युजरने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओंमध्ये ती महिला साडी नेसून डोंगरावरील साहसी खेळ खेळताना दिसत आहे.या महिलेच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वाच सर्व काही सांगून जातोय.