सोशल मीडियावर खाद्यपदार्थ बनवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा खाद्यपदार्थ बनवताना आवश्यक स्वच्छता नसलेले व्हिडीओ समोर येतात. नुकताच मुंबईतील एका हॉटलेमध्ये चिकन तळण्याच्या जाळीने गटारातील घाण काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचा अभाव असण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एका इंस्टाग्राम रीलने एक महिला थेट रस्त्यावर अंडी शिजवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये महिला एका तापलेल्या रस्त्यावर थेट अंडे फोडून टाकते आणि ऑम्लेट बनवण्यात प्रयत्न करते. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

इंस्टाग्रामवर tejalmodi454 नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. उन्हापासून वाचवण्यासाठी डोक्यावर कापड घेतले आहे. रस्त्यावर ही तरुणी बसलेली दिसत आहे. तिच्या बाजूने वाहनांची ये-जा सुरु आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ती दोन अंडी थिएटरमध्ये हसतमुखाने कॅमेरासमोर दाखवते. रस्त्यावर पाणी टाकून रस्ता साफ करते. डोक्यावरी कापडाने तो पुसून घेते. त्यानंतर थोडे तेल टाकते आणि हाताने पसरवते. त्यानंतर दोन अंडी फोडून रस्त्यावर टाकते. अंड्याचा पांढरा भाग आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळते. चमच्याने ती अंड्याचे ऑम्लेट पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तापलेल्या रस्त्यावर अंड्याचे ऑम्लेट तयार होते का हे समजत नाही कारण व्हिडीओ त्या आधीच संपतो.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

हेही वाचा –“निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात…”, पुणेरी पाटी घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणाचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ८ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. कमेंटमध्ये, बहुतेक Instagram वापरकर्ते या स्टंटवर नाखूष होते. अनेकांनी महिलेवर अन्न वाया घालवल्याबद्दल टीका केली. इतरांना अशा कन्टेंट क्रिएट करण्यासाठी रस्त्याचा वापर केल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

हेही वाचा – “२०२४ निवडणुकीतील सर्वोत्कृष्ट फोटो!”आनंद महिंद्रांनी शेअर केली पोस्ट, नेटकऱ्यांना झाला आनंद

“अन्न वाया घालवणे आवडले नाही.”

“रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हे अजिबात सुरक्षित नाही आणि दुचाकीचा अपघात कोणत्याही क्षणी होऊ शकतो. हे मूर्खपणाचे कृत्य त्वरित थांबवा.”

“शूटनंतर, मला वाटत नाही की कोणीही ते साफ करण्याची तसदी घेतली असावी. दुचाकीस्वारांसाठी ते इतके धोकादायक असू शकते.”

“रस्त्यावर तेल लावू नका – अपघात होईल.”

“ती तुम्हाला फक्त तापमान दाखवत आहे – जसे की तुम्ही रस्त्यावर ऑम्लेट बनवू शकता.”

Story img Loader