आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते मग परिस्थिती काहीही असो. याची प्रचिती दिसणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका चिमुकलीला साडी नेसवण्यासाठी तिची आई जुगाड वापरून चुटकीसरशी ब्लॉऊज तयार करताना दिसते. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना डोळ्यांवर विश्वास बसत नाही. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटिझन्सनी विनोदी पद्धतीने कमेंट केली आहे की, ” हे टॅलेंट भारताबाहेर नाही गेले पाहिजे असे म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर kusum_kumari1991 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या महिलेची ओळख कुसुम कुमारी अशी झाली आहे, जी स्वतःला इंस्टाग्रामवर “व्यावसायिक डिझायनर” म्हणून ओळख सांगते. “ही लेगिंग्जआहे. मी यापासून ब्लाउज कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते”, असे तिने तिच्या DIY व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कपड्यांचा पुन्हा वापर करून तिने पँटचे साडी ब्लाउजमध्ये रूपांतर केले आहे. तिने व्हिडिओमध्ये असे करण्याची प्रक्रिया रेकॉर्ड केली. बरं, ते फार कठीण नव्हते. हॅकमध्ये फक्त एकच पाऊल होते.

व्हिडिओमध्ये एक महिलेने स्ट्रेचेबल लेगिंग्ज वापरून चुटकी सरशी ब्लाउज तयार करताना दिसत आहे. ती महिला एका टेलरिंग मशीनजवळ उभी राहिली आणि तिच्या गळ्यात मोजमाप टेप लावली, ज्यावरून ती एक व्यावसायिक असल्याचे सूचित होते. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की, एका टेबलावर लेगिंग्ज ठेवते. ती लेगिंग्जची एक घडी घालते आणि मधोमध गोलाकार होईल असे कापते. त्यानंतर ती लेगिंग्जपासून तयार केलेला ब्लाऊज तिच्या लेकीला घालते आणि साडी नेसवते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओने नेटिझन्सना प्रभावित केले

कुसुमने या महिन्याच्या सुरुवातीला रील पोस्ट केली आणि त्याने इंस्टाग्राम वापरकर्त्यांचे लक्ष वेधले. अनेक नेटिझन्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आणि हॅकने प्रभावित झाल्याचे सांगितले. महिलेच्या टेलरिंग कौशल्याने ते थक्क झाले.

कमेंट सेक्शनमध्ये कौतुक आणि विनोदी कमेंटचा अक्षरश: पूर आला. एका लोकप्रिय कमेंटमध्ये लिहिले होते, “हे टॅलेंट देशाबाहेर नाही गेला पाहिजे.” तर दुसऱ्याने लिहिले होते, “सुपर.तुमची कल्पना मला खूप आवडली.

आतापर्यंत, व्हिडिओला जवळजवळ १.३ कोटी व्ह्यूज आणि २.८ लाख लाईक्स मिळाले आहेत.