Viral Video: भारतामध्ये इंधनांच्या दरांमध्ये नियमितपणे वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल यांची किंमत वाढत असल्याने लोक त्रस्त आहेत. यामुळे अनेकजण विद्युत वाहनांच्या पर्यायांकडे वळत असल्याचे पाहायला मिळते. इंधनांच्या दरवाढीचा परिणाम आपल्या देशासह जागतिक स्तरावर होत असल्याचे पाहायला मिळते. आपल्या काही शेजारच्या राष्ट्रामध्ये आर्थिक दिवाळखोरी माजली आहे. या देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जगात इंधनाला सोन्याचे मोल आले असल्याचे लक्षात येते. अशी परिस्थिती असताना पेट्रोलने गाडी धुणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पेट्रोलची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना पेट्रोलने गाडी स्वच्छ करणाऱ्या एका परदेशी महिलेचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती पेट्रोल पंपात उभी राहून पाईपच्या सहाय्याने गाडीच्या हेडलाइट्स व समोरचा भाग धुत असल्याचे पाहायला मिळते. पुढे ती काचा साफ करण्यासाठीही पेट्रोलचा वापर करते. गाडी स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. व्हायरल व्हिडीओमधील ही महिला गाडीवर अशा प्रकारे पेट्रोल ओतत आहे, जणू ते पेट्रोल नसून पाणी आहे.

आणखी वाचा – एक दिवसा कामावर, दुसरा रात्री मग… सुप्रीम कोर्टाने घटस्फोट मागणाऱ्या जोडप्याला दिलेला सल्ला चर्चेत

फक्त १२ सेकंदाचा हा व्हायरल व्हिडीओ ७ मिलियनपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे. अनेकांनी तो त्यांच्या अकाउंटला शेअर केला आहे. कमेंट बॉक्समध्ये असंख्य लोकांनी या व्हिडीओला त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळते. आपल्या देशामध्ये पेट्रोल पंपावर कर्मचारी असतात. तेच गाड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरत असतात. परदेशांमध्येही पंपांवर कर्मचारी असतात. पण काही ठिकाणी चालक स्वत: सुद्धा गाडीमध्ये इंधन भरु शकतात. ‘पेट्रोल पंपावर कर्मचारी नसल्याने त्या महिलेने असे धाडस केले’, असे काहीजण म्हणत आहेत. तर काहींनी “ती खूप वेडी किंवा खूप श्रीमंत आहे”, असे म्हटले आहे.

Story img Loader