मला साबण खूप आवडतो.” असे म्हणत एका महिलेने चक्क साबणाचे दोन भाग केले आणि खाल्लेही. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्व अवाक् झाले आहेत. अंघोळीचा साबण कोण खातं? असं तुम्हीही म्हणाल, तर काहींना यावर विश्वास बसणार नाही पण त्यामुळे तुम्ही थेट व्हिडीओच पाहा. सोशल मीडियावर दररोज अनोक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून खरंच आश्चर्याचा धक्काच बसतो. पण या व्हिडिओमागचे सत्य कळेल तेव्हा तुम्ही आणखीनच थक्क व्हाल. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
बापरे तरुणीने चक्क साबण खाल्ला
या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेचे नाव सुची दत्ता असून ती कोलकाता येथील रहिवासी आहे. ती एक केक बेकर म्हणून फेमस आहे, वेगवेगळे केक बनवण्यासाठी ती ओळखली जाते. ती असे केक बनवते जे पाहून हा केक आहे यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जातं. खाद्यप्रेमींना आकर्षित करण्यात ती कधीही कमी पडत नाही. ती केकपासून अशा वस्तू बनवते की तो केक आहे अशी शंकाही कुणाला येणार नाही.
असंच या साबणाचं आहे, ती जो साबण खात आहे, तो प्रत्यक्षात साबण नसून केक आहे. तिने केकला साबणासारखं बनवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी उभी आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर डेटॉल आणि साबन आहे. दोन्हीपैकी तिला साबण आवडतो म्हणत ती साबण खायला लागते. नंतर जेव्हा ती तो कट करते तेव्हा समजतं की हा साबण नसून कपकेक आहे जो साबणासारखा बनवला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलानं तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर इतका व्हायरल झाला आहे की, त्याला आतापर्यंत व्हिडीओला ३० लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर सुमारे १.५ लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे. सुचीने @21b_kolkata इन्स्टा हँडलवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मला साबण खायला आवडते. हे कॅप्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि मग विचार न करता कमेंट करू लागले. मात्र जेव्हा लोकांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना हे प्रकरण समजले.