Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ, फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. बऱ्याचदा सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. ज्यात कधी डान्स, गाणी पाहायला मिळतात तर कधी असं काहीतरी पाहायला मिळतं, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. अशा अतरंगी व्हिडीओंना अनेक व्ह्यूज आणि लाइक्स, कमेंट्सदेखील मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल.
महिलावर्ग नेहमीच ट्रेंडिंग फॅशनच्या शोधात असतो. त्यांची नवनवीन फॅशन अनेकांना मोठे आश्चर्यच असते. आतापर्यंत आपण साडी नेसण्याच्या विविध पद्धती पाहिल्या असतील. कधी जीन्सवर तर कधी साडीवर जॅकेट घालणं ही नवीन स्टाइल आपण पाहिलीच असेल, पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
नक्की काय दिसलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिलांनी नऊवारी साडी नेसली असून संपूर्ण मराठमोळा लूक केला आहे. शिवाय त्यांनी डोळ्यांवर गॉगलदेखील लावलेला आहे. पण, विशेष म्हणजे यावेळी महिलांनी नेसलेल्या साडीच्या काठावर एलइडी स्ट्रिप लाइट लावलेली दिसत आहे. यावेळी या महिला नाचतानादेखील दिसत आहेत. शिवाय रस्त्यावरील लोक महिलांकडे उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its__mamta02 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स लाइक्स आणि कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “महिलांची गँग”, दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “एकदम जबरदस्त”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “नवीन स्टाइल”, तसेच अनेक जण आणखी कमेंट्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.