Viral Video Today: साहसप्रेमी अनेकदा काहीतरी वेगळं करू पाहण्याच्या नादात आपल्या लिमिट्स पुढे ढकलतात. अशाच एका खवय्या स्कायडायव्हिंग करणाऱ्या महिलेने ऑनलाइन प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेने उंच आकाशात हेलिकॉप्टरमधून झेप घेताच असं काही केलं की जे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. असं म्हणतात खवय्यांना जागेचे बंधन नसते या महिलेकडे पाहून याची चांगलीच प्रचिती येते. पण असं या महिलेने नेमकं केलंय तरी काय, चला पाहुयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर, मॅकेना नाईप (McKenna Knipe) या इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर नेहमीच आपल्या फॉलोवर्सना थक्क करणारे सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अलीकडे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे खाण्याचे व साहसाचे प्रेम एकत्र करून त्यांनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. सोबतच एका लघुद्योगाला सुद्धा चालना देण्याचे काम केले आहे.

साहेब अच्छे दिन…सिलेंडर डिलिव्हरीला आलेल्या तरुणाची भाषा ऐकून व्हाल थक्क, Linkedin पोस्ट होतेय Viral

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मॅकेना यांनी स्काय डायव्हिंग करताना आकाशातच एक पाय (pie) चा बॉक्स उघडला. मिशिगनच्या नेपोलियन कॅफेची प्रसिद्धी करण्यासाठी हे स्टंट केल्याचे मॅकेना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे या पायचा मनसोक्त आस्वाद घेताना मॅकेना बाजूने जाणाऱ्या विमानांना फ्लाईंग किस देताना दिसत आहे. मॅकेनाचा हा व्हिडीओ अगदी गोड असल्याचे अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे.

या व्हिडिओला पोस्ट केल्यापासून तब्बल २० मिलियन व्ह्यूज आहेत. यापूर्वीही मॅकेनाने अशाच प्रकारे आकाशात पिझ्झा, बर्गर व असे अनेक पदार्थ खात धमाल व्हिडीओ शेअर केले होते.

पाहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, मॅकेनाच्या व्हिडिओवर अनेकांनी तितक्याच मजेशीर कमेंट केल्या आहेत. समजा जर चुकून हा पाय कोणाच्या डोक्यावर पडला तर असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींना मात्र हा असा अन्न व जीवाशी खेळ करणे फार आवडलेले नाही.