Viral Video: हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षड्यंत्रे आखून चोरी करतात. पण, वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच. खरंतर, भारतीय महिलांसाठी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लाख मोलाचे असते, त्यामुळे जर त्यावर कोणाची वाईट नजर पडली तर अनेक जणी चवताळतात. आजपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, परंतु यात मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरांबरोबर महिला असं काही करते, जे पाहून तुम्हीही तिच्या धाडसाचे कौतुक कराल.

दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरंतर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही फक्त जास्त पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी चोरी, लूटमार करतात. सोशल मीडियामुळे असे अनेक प्रकार वारंवार आपल्यासमोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या मुलीला स्कुटीवरून शाळेतून घरी घेऊन आली असून तिची मुलगी घराचे गेट उघडण्यासाठी खाली उतरते. यावेळी मागून एका बाईकवरून दोन चोर येतात आणि स्कुटीवर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ती महिलादेखील त्यातील एकाचा हात पकडते आणि त्यांना पळून जाण्यापासून रोखते. बराचवेळ झटापट झाल्यानंतर यावेळी मागे बसलेला चोर खाली पडतो. शेवटी महिला त्याच्या हातातून तिचं मंगळसूत्र खेचते. लोक जमा होत असल्याचं कळताच दोन्ही चोर पळून जातात.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील parivartan_news या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “अशा वेळेस जनतेने मिळून नेहमी चोप द्यावा” आणखी एकाने लिहिलेय, “मंगळसूत्र नाही नेऊ दिलं, मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “वाघीण आहे ही.”