प्रवासादरम्यान ड्रायव्हिंग करताना किंवा एखाद्या ठिकाणी गाडी पार्क करताना आपली गाडी दुसऱ्या गाडीला धडकू नये यासाठी अनेक चालक नेहमी काळजी घेत असतात. गाडी पार्क करताना अनेक गाड्या एकमेकांना धडकतात आणि मग वाहनांचे नुकसान तर होतेच. पण, त्याचबरोबर वाहनचालकांमध्ये वादही होतात. तर आज यासाठी एका तरुणीने जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे; जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत एक गाडी पार्क केलेली दिसते आहे. तर या गाडीच्या पुढे तरुणीला तिची गाडी पार्क करायची असते. पण, तिची गाडी रिव्हर्स येत असते. अशा परिस्थितीत आपली गाडी धडकून दुसऱ्याच्या गाडीचे नुकसान होऊ नये यासाठी त्या तरुणीने उपाय म्हणून तिच्या गाडीच्या मागच्या बाजूला एक मोठी पाण्याने भरलेली प्लास्टिक बाटली लावली आहे. जशी ही गाडी मागे येते, तशी ही पाण्याची बाटली आधीच पार्क केलेल्या गाडीला धडकते. त्यामुळे पाण्याच्या बाटलीवर दाब येतो. एकदा पाहाच तरुणीचा हा जबरदस्त जुगाड.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा गाडी मागे येते आणि पार्क केलेल्या गाडीला धडकते तेव्हा पाण्याने भरलेल्या बाटलीवर दाब येतो. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाटलीला एक पाइप जोडला आहे; जो थेट तरुणीच्या ड्रायव्हिंग सीटपर्यंत पोहोचला आहे आणि या पाइपच्या खाली एक ग्लास ठेवला आहे. गाडी पार्क करताना जेव्हा तरुणीची गाडी दुसऱ्या कारला धडकते तेव्हा या बाटलीतील पाणी पाइपद्वारे थेट ग्लासात जाऊन पडते. तेव्हा महिलेला इथपर्यंतच आपली गाडी मागे घ्यायची आहे हे समजते.
कोणाचीही मदत न घेता आणि दुसऱ्यांच्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून महिलेने हा जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे; ज्याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @manju143_kumari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे.