सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. दररोज कोणाचं ना कोणाचं लग्न, हळद किंवा साखरपुडा होत असल्याचे पाहायला मिळते. होणाऱ्या जोडीदारासाठी वर आणि वधु दोघेही काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करतात. काहीजण आपल्या पार्टनरसाठी लग्नामध्ये डान्स शोचे आयोजन करत त्यामध्ये स्वत: डान्स करतात. तर काही लोक आपल्या जोडीदाराला गिफ्ट्स देऊन खुश करतात. आजकाल प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक त्यांच्या पार्टनरच्या नावाचे टॅटू गोंदवून घेत असतात. आपल्या नवऱ्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी शरीरावर टॅटू काढून घेणाऱ्या एका महिलेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
साधारणपणे लोक हातांवर, पायांवर किंवा मानेवर टॅटू गोंदवले जातात. कोणीही स्वत:च्या कपाळावर टॅटू गोंदवून घेत नाही. पण बंगळूरुमधील एका महिलेने जोडीदारावर आपण किती प्रेम करतो हे सांगण्यासाठी कपाळावर त्याच्या नावाचा टॅटू बनवून घेण्याचा निर्णय घेतला. या आगळ्या-वेगळ्या टॅटूमुळे सोशल मीडियावर या महिलेचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टॅटू आर्टिस्ट या महिलेच्या कपाळावर टॅटू काढत असल्याचे पाहायला मिळते. तो सुरुवातीला तिच्या पार्टनरच्या नावाचे स्टेन्सिल लावतो आणि पुढे मशीनचा वापर करुन त्यावर टॅटू काढायला लागतो.
कपाळावर टॅटू गोंदवणून घेणाऱ्या या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओला २,५०,००० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘टॅटू काढल्यावर घटस्फोट झाला तर..’ असे गमतीने म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘म्हणून शिक्षण गरजेचं असतं’ अशी कमेंट केली आहे. बऱ्याच जणांनी हा टॅटू खोटा आहे असेही म्हटले आहे. या व्हिडीओनंतर पोस्ट केलेल्या अन्य व्हिडीओमध्ये या महिलेच्या कपाळवर टॅटू दिसत नसल्याचे तो टॅटू पर्मनंट नसल्याचे लक्षात येते.