Viral Video: समाजमाध्यमांवर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेचे जॅकेट उसाचा रस काढण्याच्या मशीनमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे.
मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे आपण अनेक व्हिडीओंमध्ये पाहतो. पण, अनेकदा ज्यांचे दैव बलवत्तर असते, ते लोक मोठमोठ्या भयानक अपघातांमध्येही सुखरूप राहतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच घटना पाहायला मिळतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी उसाचा रस काढण्यासाठी मशीन सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी एक महिला मशीनच्या बाजूने जाते आणि दुर्दैवाने तिचे जॅकेट मशीनमध्ये अडकल्याने ती चक्क मशीनबरोबर गोल गोल फिरते. इतक्यात एक व्यक्ती तिथे येते आणि मशीन बंद करून, त्या महिलेचा जीव वाचवते. सध्या हा भयानक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pratahkallive या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलेय, “मंद बाई एवढ्या अडचणीतून कशाला जात होती”. दुसऱ्याने लिहिलेय, “बापरे, खूपच भयानक”. आणखी एकाने लिहिलेय, “तो माणूस देवासारखा धावून आला”.