आतापर्यंत तुम्ही लग्नाच्या वरातीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आपल्या लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. आपलं लग्न अगदी खास बनावं आणि या आठवणी आयुष्यभर सोबत राहाव्या यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. लोक वेगळं काहीतरी करून चर्चेत येण्याचाही प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात बिहार आणि बिहारचे लोक देशभरात त्यांच्या वेगळ्या स्टाइलसाठी खूप चर्चेत आहेत. सध्या अशाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाची वरात कोणत्या बैलगाडी किंवा जेसीबीवरून नव्हे तर चक्क विमानातून गेली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात काही महिला प्रवासादरम्यान पारंपारिक गाणी गाताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कुटुंबीयांनी चक्क विमानातून लग्नाची वरात काढली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर patnabeats नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडीओ त्याआधी @darbhangawale_ नावाच्या एका अकाऊंटवर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पत्नीने दिलेलं गिफ्ट उघडताच तो भावूक झाला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले…, तुम्हीही व्हाल भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्वतःच्या सावलीसोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL, पाहून खळखळून हसाल

‘मिरवणूक बैलगाडीने असो वा विमानाने, संस्कार केले जातात’, असं या व्हिडीओवर लिहिण्यात आलंय. विमानातून निघालेल्या वरातीत सामील झालेल्या महिलांनी चेहऱ्यावर मास्क घालून पारंपरिक गाणी गाताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. “आपल्या संस्कृतीचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटत असतो.” अशा कमेंट्स या व्हिडीओखाली देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video women singing traditional folk songs of marriage in flight carrying barat prp