आजकाल सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईलं हे सांगता येत नाही. सध्या अनेक मनोरंजक आणि मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स (Woman Dance At Railway Station) करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोविंदाच्या गाण्यावर महिला कलाकार जबरदस्त डान्स करते.
महिलेचा डान्स इतका जबरदस्त आहे की स्टेशनवरचे लोक तिचे प्रेक्षक झाले. गोविंदाच्या गाण्यांवर ती महिला खूप छान नाचते हे तुम्हाला दिसेल. इतकंच नाही तर जवळून पाहिलं तर मागे उभी असलेली मुलंही महिलेच्या डान्स स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहेत. इंटरनेट यूजर्सना महिलेची ही मस्त स्टाइल खूप आवडली आहे.
(हे ही वाचा: अजब प्रेम कहाणी! विद्यार्थिनी चक्क शिक्षकालाच घेऊन पळाली; म्हणाली, “आता जगणं…”)
(हे ही वाचा: अॅटिट्यूड दाखवत रस्त्यावरून चालत होती मुलगी आणि पुढे…; बघा हा viral video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ @mehnanitu नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळ जवळ १२ लाख लोकांनी बघितला आहे. अनेक लाख लोकांनी या व्हिडीओला लाइकही केलं आहे. व्हिडीओची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती महिला न लाजता तिच्या डान्सची पूर्ण मजा घेत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. प्रापंचिकपणा विसरून आपल्या आयुष्याचा आनंद लुटण्याचा एक प्रकारचा संदेश ही महिला आपल्या नृत्यातून देताना दिसत आहे.