Viral Video: कुत्रा अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. कुत्र्याला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. त्याशिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. अलीकडे अनेक जण कुत्र्याचा वाढदिवसदेखील आवडीने साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; त्याशिवाय या लाडक्या प्राण्याचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
घरातील मोठ्यांचा ओरडा खाणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. आपल्या वाईट गोष्टींवर नेहमीच आई-बाबांचे लक्ष असते; ज्यावरून ते आपल्याला सतत ओरडत असतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असेच काहीतरी पाहायला मिळत आहे; पण या व्हिडीओमध्ये आई-बाबा त्यांच्या मुलांना नाही, तर श्वानाच्या पिल्लाला ओरडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला घरातील पाळीव श्वानाला त्याच्या आगाऊपणामुळे ओरडताना दिसत आहे. यावेळी ती त्याला बरेच काही बोलते. त्यामागचे कारणही तसेच आहे. कारण- या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे श्वानाच्या पिल्लाने त्या महिलेच्या चार्जरची वायर तोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ती श्वानाच्या पिल्लाला ओरडते. मालकिणीच्या ओरडण्यामुळे ते पिल्लू घाबरून केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत आहे. बराच वेळ मालकीण श्वानाच्या पिल्लाला ओरडते. त्यानंतर श्वान खाली मान घालून निघून जातो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lovelypets422 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘वायर कोणी तोडली?’, असं लिहिलं आहे. दरम्यान, अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “प्लीज, तुम्ही त्याला ओरडू नका.” तर आणखी एका युजरने लिहिलेय, “बिचारा पप्पी.” आणखी एकाने लिहिलेय, “तुम्हाला लाज कशी वाटत नाही, त्याला असं ओरडताना.” अनेक जण या व्हिडीओवर राग व्यक्त करतानाही दिसत आहेत; तर काही जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यात एक मालकीण तिच्या श्वानाला धमकावताना दिसली होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.