Viral Video: एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. सध्या ‘पुष्पा २’ हा चित्रपट खूप चर्चेत असून, या चित्रपटातील ‘सुसेकी’ हे गाणं खूप चर्चेत आले होते. तसेच २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’, ‘बलम सामे’ ही गाणीरही डान्स स्टाईलमुळे खूप गाजली. आता याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागामधील ‘किसीक’ हे गाणे खूप चर्चेत आहे; ज्यावर नेटकरी रील्स बनविताना दिसत आहेत.
महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर एखादी रील बनविताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच काही महिला आहेत; ज्या किसीक या गाण्यावर रील डान्स करीत आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन महिलांनी साडी नेसली असून, किसीक या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.
हेही वाचा: ‘पहला तेरे नैन मैं देखे…’ गाण्यावर चिमुकली करतेय भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @mansi.gawande.73 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि तीन हजाराहून अधिक लोकांच्या लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “अप्रतिम नृत्य सादरीकरण” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खुप खुप छान ताई.” आणखी अनेकजण त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.