Shocking video: अलीकडच्या काळात लोकांना मोबाईच असे व्यसन लागले आहे की, त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचेही भान नसते. तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे मोबाईलवर बोलताना एका जागी थांबत नाही आणि बोलता बोलता चालत कुठे जातात ते त्यांनाही समजत नाही. असाच एक महाशय मोबाईलवर गप्पा मारत चक्क रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. पोहोचला तो पोहोचला पण तो तिथंच बसला आणि त्याचवेळी ट्रेन आली यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा. या धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

हा तरुण रेल्वे ट्रॅकवर फोनवर गर्लफ्रेंडशी गप्पा मारत बसला आहे. याच वेळी एका बाजूने ट्रेन येत आहे. मात्र या तरुणाला हे देखील लक्षात येत नाही. ट्रेनचा लोको पायलट अनेकवेळा हॉर्न देऊनही तरुण रेल्वे ट्रॅकवरुन उठत नाही. तरुण फोनवरच बोलण्यात मग्न असतो. पायटलच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला आहे. लोको पायलट खाली उतरुन या तरुणाला मारयला देखील जातो मात्र, तरुण तिथीन पळ काढतो. या तरुणाला हेही लक्षात येत नाही ट्रेन भरधाव वेगामध्ये असती तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा राहून फोनवर गर्लफ्रेंडशी बोलत आहे. तो कॉलमध्ये इतकी गुंग झाली की समोरील परिस्थितीकडे लक्ष देण्यास विसरला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ट्रेन येत आणि मात्र तरीही त्याला काही भान नाही, यावेळी ही ट्रेन अगदी त्याच्या जवळ येते तेव्हा तो पटकन तिथून उठतो. ट्रेनचा वेग कमी असल्यानं हा तुण बचावला अन्यथा त्याचा मोठा अपघात झाला असता.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ army_lover_ajay_yadav_ghzipur नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “प्रेम अंधळं असतं ” तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

Story img Loader