Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना प्रसिद्धीसाठी रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंटचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे; अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात दोन तरुण हायवेवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर विविध व्हायरल व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडीओंमुळे आपल्या अंगावर काटा येतो. अशा प्रकारचा व्हिडीओ समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. दरम्यान, या दोन तरुणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण भररस्त्यात हायवेवर स्केटिंग करत असून हे दोघेही एका धावत्या ट्रकबरोबर स्केटिंग करताना दिसत आहेत. यावेळी त्यातील एक तरुण कधी ट्रकच्या मागच्या बाजूला पकडून स्केटिंग करत आहे, तर कधी ट्रकच्या खालून जात आहे आणि यावेळी दुसरा तरुणदेखील स्केटिंग करत-करत व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “जर हे तरुण ट्रकच्या चाकाखाली आले असते, तर घरातल्यांनी ट्रकवाल्यावर केस केली असती. त्याच्या घरच्यांना त्याच्या शरीराचा एकही अवयव पाहायला मिळाला नसता. अशा लोकांच्या बेफिकीरपणामुळे लोक फसतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून हा @ निशांत शर्मा (भारद्वाज) या अकाउंंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘आई मला सोडून जाऊ नको…’ आईच्या मृत्यूनंतर हत्तीच्या पिल्लाचा शोक; हृदयस्पर्शी Photo पाहून व्हाल भावूक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “काहीतरी वेगळं करायच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “देवाने यांना लवकर वर बोलवावे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे खूप भयानक आहे.” तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात यावी.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video young boy skating under a moving truck netizens expressed their anger after seeing the video sap