Viral Video: हल्ली सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंड्सनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनविताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा स्टंट करीत आहे. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो; जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळेच होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंट्समुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण एका उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतायत, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका गडाच्या तटबंदीवरील कट्ट्यावर चढून सुरुवातील व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला बायसेप्स दाखवतात. त्यानंतर मागच्या बाजूला उंच उडी मारतात आणि पुन्हा स्वतःचा तोल सावरून कट्ट्यावर उभे राहतात. तरुणांच्या मागे दिसत असलेली दरी खूप खोल असून, चुकून त्यांना स्वतःचा जीव सावरता आला नसता, तर त्यांना जीव गमवावा लागला असता. हा जीवघेणा स्टंट पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iabhi.choudhary या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दीड लाखाहून अधिक व्ह्युज आणि पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘जेव्हा लावलेला अंदाज चुकतो…’, बाईकवरून स्टंट करताना अचानक चाक निसटलं अन् पुढे जे घडलं…; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बहुतेक सध्या यमदेवाला सुट्टी आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “भावांनो, असे व्हिडीओ नका बनवू प्लीज.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “तुम्हाला तुमच्या आई-बाबांची शपथ; असे व्हिडीओ नका बनवू.” चौथ्या युजरने लिहिलेय, “बापरे खूपच भयानक.”

Story img Loader