Viral video: सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. हे जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून हसून हसून पुरेवाट लागते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका डान्सची तुफान चर्चा होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी विचित्र डान्स करताना दिसत आहे. मात्र याचे चांगलेच परिणाम तिला भोगावे लागले आहेत. तिला जन्माची अद्दल यावेळी घडली आहे, असं या तरुणबरोबर काय घडलं हे तुम्हीच पाहा.
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेसीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांशिवाय अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तुम्ही अनेक रस्ते अपघातांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. अनेकदा इतके गंभीर आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एका व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. खरं तरं या व्हिडिओतून आपला निष्काळजीपण किती महागांत पडू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे मात्र हा व्हिडिओ तुम्हाला हसवल्याशिवायही राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गोठ्याचा परिसर दिसत आहे. तिथेच एक गाय आणि म्हैस चारा चरताना दिसत आहेत. याच वेळी एक तरुणी एका म्हशीला चारा खायला टाकते. त्यानंतर ती अचानक असे काहीतरी करते की, म्हैस देखील वैतागते. ही तरुणी अचानक विचित्र हातावारे करत डान्स करायला लागते. हे पाहून ती म्हैस तिला आपल्या शिंगांनी जोरात धक्का देते. यामुळे तरुणी जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीत जाऊन पडते. तिला उठणही कठीण होते इतक्या जोरात म्हशीने धक्का दिलेला असतो.हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसावे की राडावे हे कळणार नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘आ भैंस मुझे मार’ ही म्हण लिहिली आहे. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने म्हटले आहे की,” कुठेही काहीही केल्यावर असंच होणार”, तर आणखी एकानं “व्हिडीओसाठी कोणत्याही थराला जाते तरुणाई” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण असे विचित्र कृत्य रस्त्याच्या मधोमध करणे महागात पडू शकते.