Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. हल्ली अनेक जण सोशल मीडियावर विविध पदार्थांच्या रेसिपी शेअर करत असतात. अनेकदा अशा काही हटके पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे व्हिडीओदेखील खूप व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी चिली आइस्क्रीम, चीज आइस्क्रीम तर कोणी मॅगीचे चीज बॉल्स बनवतं. असे एकापेक्षा एक हटके पदार्थ कसे बनवतात हे पाहण्यासाठीदेखील अनेक जण गर्दी करतात; शिवाय काही हौशी खवय्ये हे पदार्थ खाण्याचाही आस्वाद घेतात. दरम्यान, आता अशाच एका हटके पदार्थाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती कधीही न खाल्लेली हटके रेसिपी बनवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बरेच जण हल्ली फूड ब्लॉग बनवण्याला पसंती देत असून या फूड ब्लॉगर्सच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ बनणाऱ्या अनेक विक्रेत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही विक्रेते केवळ प्रसिद्धीसाठी हा व्यवसाय करतात. ज्यासाठी ते अनोखे पदार्थ ट्राय करत असतात, शिवाय अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खवय्येदेखील त्यांच्या स्टॉलवर गर्दी करतात.

आतापर्यंत तुम्ही साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा, चीज डोसा अशा अनेक प्रकारचे डोसे ट्राय केले असतीलच, पण तुम्ही कधी गुलाबजाम डोसा खाल्ला आहे का? गुलाबजाम डोसा खाण्याचा विचार कधी कोणी स्वप्नातही केला नसेल, पण सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील तरुण गुलाबजाम डोसा बनवताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोसा बनवणारा तरुण सुरुवातीला तव्यावर डोश्याचे पीठ टाकतो आणि ते तव्यावर पसरवतो. त्यानंतर त्यावर तो गुलाब जाम टाकतो आणि त्यांना स्मॉश करून पसरवतो, शिवाय त्यावर तो व्हाइट क्रीम, साखरेचा पाकदेखील टाकतो आणि त्याला त्रिकोणी आकार देऊन त्यावर क्रीम आणि नारळाचा किस टाकून सर्व्ह करतो. यावेळी हा डोसा खायला आलेले व्यक्ती चवीने डोसा खातात.

हेही वाचा: अगं, आई मारू नको! आगाऊ पिल्लाला माकडिणीकडून बेदम चोप; VIDEO पाहून येईल हसू

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @foodpandits या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये अतरंगी गुलाबजाम डोसा असं लिहिलं आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ३.२ मिलियन व्ह्यूज आणि साठ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत.